इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजारामनगर यांच्या वतीने नवीन ऑनलाइन पीयूसी सेंटरचे जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि भगतसिंह पाटील (बीओजी चेअरमन) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आरआयटी महाविद्यालय हे नेहमीच तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालत आलेले आहे. त्याचेच एक पाऊल म्हणून तसेच शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले आणि त्याचबरोबर वाहनांची प्रदूषणपातळी तपासून वायुप्रदूषण रोखण्यास हातभार लावणारे हे सेंटर सुरू केले आहे. या सुविधेचा लाभ परिसरातील वाहनधारकांनी घ्यावा, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
येथील आरआयटी ऑटो केअरमध्ये सुरू करण्यात आलेल्या पीयूसी सेंटरचे उद्घाटन प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील, उद्योजक आदित्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सुधारित वाहन कायद्यांतर्गत सर्व वाहनांचे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे अनिवार्य केले आहे. या सुविधेमधून इस्लामपूर आणि जवळील क्षेत्रांमधील सर्वसामान्य वाहनचालकांना सवलतीच्या दरामध्ये पीयूसी सर्टिफिकेटसोबत वाहनांचे जनरल चेकअप करून दिले जाईल.
यावेळी शामरावकाका पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. हणमंत जाधव, प्रा. संभाजी साळुंखे उपस्थित होते. प्रा. राजेंद्र सरगर, प्रा. प्रवीण देसाई यांनी संयोजन केले.