शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर विड्याच्या पानांचा बाजार तेजीत, मिरजमधून मोठ्या प्रमाणात निर्यात 

By संतोष भिसे | Updated: November 13, 2023 15:46 IST

बेडग : विड्याच्या पानांचा दिवाळीच्या मुहुर्ताचा बाजार चांगलाच तेजीत राहिला. रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर पानाचे आगर असलेल्या मिरज पूर्व ...

बेडग : विड्याच्या पानांचा दिवाळीच्या मुहुर्ताचा बाजार चांगलाच तेजीत राहिला. रविवारी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्तावर पानाचे आगर असलेल्या मिरज पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात निर्यात झाली.  सध्या कळी पानाचा हंगाम सुरु असून मार्गशीर्ष महिन्यात उतरण सुरु होईल. तत्पूर्वी लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्ताला शेतकऱ्यांनी सौद्यासाठी पाने आणली होती. बेडग, नरवाड, आरग, मालगाव, भोसे, एरंडोली, म्हैसाळ, विजयनगर, मल्लेवाडी आदी गावांतून मुहुर्ताचा माल पान अड्ड्यांवर आला होता. कळी पानाच्या डप्पीला ५०० रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. एका डप्पीमध्ये तीन हजार पाने असतात. ही पाने कोकण, मराठवाडा,  पुणे, मुंबई, पंढरपूर, सोलापूरसह कोल्हापुरला पाठविण्यात आली. गेल्या काही वर्षांत खाऊच्या पानांचे सौदे गावोगावी सुरु झाले आहेत. खरेदीसाठी बाहेरगावाहून दलाल येतात. जागेवर सौदा आणि जागेवर पैसे अशा रोकड्या व्यवहारांमुळे शेतकऱ्यांनाही चांगला भाव आणि ताजा पैसा मिळू लागला आहे. लक्ष्मी पूजनाच्या मुहुर्ताला चांगला भाव मिळतो हे अपेक्षित धरुन शेतकऱ्यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात पाने आणली होती. अपेक्षेनुसार चंगला भाव मिळालादेखील. चांगल्या दर्जाच्या कळी पानाला अडीच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला. म्हणजे एका पानाला तब्बल ८५ पैसे किंमत मिळाली.दिवाळीच्या सौद्यांसाठी शेतकऱ्यांनी सजवून-धजवून डप्पी आणली होती. पान अड्ड्यांवर रोषणाई केली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत मुहुर्ताचे सौदे निघाले.

बाजार तेजीतच राहणारगेल्या काही वर्षांत पानमळे झपाट्याने कमी झाले आहेत. पानमळ्याची शेती खर्चिक, वातावरणाला संवेदनशील आणि बाजाराच्यादृष्टीने बेभरवशाची झाली आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळे तोडून टाकले आहेत. त्या जागी ऊस किंवा द्राक्षबागा केल्या आहेत. साहजिकच पानांचे उत्पादन कमी झाले आहे. मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे आगामी वर्षभर पानबाजार तेजीत राहील असे दलालांनी सांगितले. 

लक्ष्मी पूजनाच्या सौद्याच्या मुहुर्ताना पानबाजार तेजीत राहिला. दरही चांगला मिळाला. बेडगमधून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाने पाठविली जातात. सौद्यांना शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला होता. - शशिकांत नलवडे, पान दलाल, बेडग

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजारDiwaliदिवाळी 2023