शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांचे नाव बदलणे निषेधार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2015 23:55 IST

शिवाजीराव देशमुख : सम्राट महाडिक यांचे उपोषण

इस्लामपूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी नियमावली आहे. मात्र वसंतदादांच्या नावाऐवजी अन्य नाव देण्यासाठी आयत्यावेळचा ठराव करून नाव बदलणे, ही निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे दादांचे नाव कायम राहण्यासाठीच्या सनदशीर लढ्यात आपण न्याय मिळेपर्यंत बरोबर राहू, अशी ग्वाही विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी शुक्रवारी दिली. वाळवा पंचायत समितीच्या आवारात जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून, आ. जयंत पाटील आणि पदाधिकारी, प्रशासनावर टीकेची झोड उठवली. सायंकाळी पाच वाजता देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली. देशमुख म्हणाले, दादांसारख्या महनीय व्यक्तीबाबत खोडसाळपणा करणे निषेधार्ह आहे. राजारामबापूंच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्याचवेळी कोणी दादांच्या नावाला विरोध करीत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील म्हणाले, जयंत पाटील यांनी चुका सुधारून आता तालुका, जिल्ह्याच्या पालकत्वाची भूमिका घ्यावी. सभागृहाला वसंतदादांचे नाव कायम ठेवावे. जि. प. सदस्य सम्राट महाडिक म्हणाले, राजारामबापूंच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र दादांच्या नावाला शासननिर्णयाने मान्यता असताना, विरोध खपवून घेणार नाही. दिवसभरात काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, ‘बळीराजा’चे बी. जी. पाटील, स्वाभिमानीचे अ‍ॅड. यु. एस. संदे, भाजपचे विजय कुंभार, शिवसेनेचे दि. बा. पाटील, रिपाइंचे अरुण कांबळे, अ‍ॅड. एच. आर. पवार, पं. स. सदस्य प्रकाश पाटील, नजीर वलांडकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकर कदम यांची भाषणे झाली. उपोषणस्थळी शैलजा पाटील, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, अभिजित पाटील, आ. शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सरपंच गौरव नायकवडी, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. चेतन शिंदे, वैभव पवार, सतीश महाडिक, सोमनाथ फल्ले, सुजित थोरात, जलाल मुल्ला, अ‍ॅड. फिरोज मगदूम, मोहन मदने, राजेंद्र शिंदे, पं. स. सदस्य अजित भांबुरे, प्राजक्ता देशमुख, राजश्री माळी, अमित ओसवाल, विशाल शिंदे, मुनीर इबुशे, मन्सूर वाठारकर, शिवसेनेचे शकील सय्यद, एल. एन. शहा, बाबा सूर्यवंशी, आनंदराव पाटील, हर्षवर्धन पाटील, मोहन वळसे, गणेश परीट, रणजित आडके, सुरेश पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)