ते म्हणाले, कारखान्याने आजवर ऊस विकास योजनांचे काटेकोर पालन, मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन पद्धतीचा वापर, उसाची हंगामनिहाय, जातवार लावण व तोडणी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी, ऊस विकास योजनांबाबत भरीव तरतूद, ऊस बेणे बदल आणि बेनेमळा योजनेवर भर, कारखान्याच्या कृषी कर्मचारी आणि शेतकरी प्रशिक्षणावर भर, कृषी निविष्ठांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा, तसेच ऊस विकास योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख रक्कम एक लाख रुपये असे आहे. त्याच पद्धतीने कारखान्याचे पर्यावरण अधिकारी सागर बंडोपंत पाटील यांना ‘उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.