शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बँक विलिनीकरणास जिल्हा बँकेची नापसंती, तूर्त प्रस्ताव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 19:12 IST

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह १५ शाखांच्या इमारतींची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देतोट्याचा प्रश्न कळीचा : प्रशासनाची तूर्त विषयाला बगलचालू आर्थिक वर्षाकरीता प्रस्ताव बारगळल्याचे चित्र

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे.

सर्वाधिक लाभांश देणारी बॅँक म्हणून सहकार क्षेत्रात वसंतदादा बॅँकेचा एकेकाळी दबदबा होता. मात्र नियमबाह्य कर्जवाटप, संचालकांचा मनमानी कारभार, इमारतींवर केलेला अवाढव्य खर्च, राजकारण्यांना दिलेली बेकायदेशीर कर्जे यामुळे बॅँकेचा तोटा वाढत गेला आणि बॅँक बंद पडली. बॅँकेच्या सांगलीसह राज्यात ३६ शाखा होत्या.

बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी मिळणे मुश्किल झाले. याबाबतच्या तक्रारीनंतर रिझर्व्ह बँकेने तत्कालीन सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या अहवालानंतर २६ जून २००८ रोजी रिझर्व्ह बॅँकेने बँकेवर आर्थिक निर्बंध घातले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत ७ जानेवारी २००९ रोजी या बँकेचा बॅँकिंग परवाना रिझर्व्ह बॅँकेने रद्द केला व १६ फेब्रुवारीरोजी बॅँकेवर अवसायक मंडळ आले.

जिल्हा बॅँकेत ४६ लाखांचे शेअर्स वसंतदादा बॅँकेचे आहेत. ते परत मिळावेत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. बॅँकेचे अवसायक शीतल चोथे यांनी अनौपचारिकरित्या वसंतदादा बॅँक जिल्हा बँकेत विलीन करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हा बॅँकेच्या पॅनेलवरील सीए व अर्थतज्ज्ञांकडून वसंतदादा बॅँकेची मालमत्ता, येणी, देणी, कायदेशीर बाबी आदींची तपासणी करून अहवाल देणार आहे. हा अहवाल संचालक मंडळात मांडून तेथे निर्णय होईल. त्यानंतर रिझर्व्ह बँक व राज्य शासनाच्या मंजुरीने विलिनीकरणाबाबत निर्णय होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

प्रत्यक्षात गेल्या काही महिन्यात झालेल्या आर्थिक अहवालाचा विचार करता ही बॅँक तूर्त जिल्हा बॅँकेत विलीन करणे जोखमीचे ठरणार असल्याचे दिसत आहे. तसाच सूर प्रमुख अधिकाऱ्यांमधूनही उमटत असल्याचे समजते. त्यातच जिल्हा बॅँकेच्या नफ्याला गत आर्थिक वर्षात विविध शासकीय धोरणांनी फटका बसला होता. त्यामुळे बॅँकेच्या नफावृद्धीवर सध्या पदाधिकारी व प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय वसंतदादा बॅँकेचा निर्णय न घेण्याचेही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.

वास्तविक चालू आर्थिक वर्षात नोकरभरतीच्या माध्यमातूनही बॅँकेच्या आस्थापनाचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे वाढत्या खर्चात वसंतदादा बॅँकेची जबाबदारी घेणे व्यावहारिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, असेही मत पुढे येत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळणार आहे.

अशी आहे वसंतदादा बँकेची आर्थिक स्थिती...वसंतदादा बॅँकेच्या ठेवीदारांची १६० कोटींची ठेव विमा महामंडळाच्या माध्यमातून परत करण्यात आली. कर्जदारांकडील सुमारे ८० कोटी रुपये वसूल करून विमा महामंडळाला परत करण्यात आले आहेत. बॅँकेच्या भाड्याच्या इमारतीतील शाखा बंद करण्यात आल्या. स्वमालकीच्या १७ इमारतींमधील शाखाही बंद करण्यात आल्या असून, यातील गोरेगाव (मुंबई) व सांगलीतील गावभाग शाखेची इमारत विकण्यात आली आहे.

सध्या प्रधान कार्यालयासह १५ शाखा ठेवण्यात आल्या आहेत. या शाखाही कागदोपत्री आहेत. सर्व कारभार प्रधान कार्यालयातूनच चालतो. मार्च १७ अखेर १५८ कोटींच्या ठेवी द्यायच्या आहेत, तर १६९ कोटींची थकीत कर्जाची येणेबाकी आहेत. बॅँकेच्या प्रधान कार्यालयासह १५ शाखांच्या इमारतींची किंमत सुमारे ६० कोटींच्या घरात आहे.

टॅग्स :SangliसांगलीVasantdada Patilवसंतदादा पाटीलbankबँक