शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादा बॅँक बाडबिस्तारा गुंडाळणार : सांगलीतील मुख्यालय विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:21 IST

सांगली-मिरज रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली बॅँकेच्या मुख्यालयाची सुंदर वास्तू बॅँकेच्या हातून गेली आहे. वसंतदादांच्या नावची ही संस्था अवसायनातही किमान नावासहीत उभी होती. आता बॅँकेच्या इमारतीवरील नावही संपुष्टात येईल. बॅँकेच्या अधोगतीचा हा प्रवास अनेकांना वेदनादायी ठरणारा आहे.

ठळक मुद्देकामकाज करण्यासाठी पर्यायी जागेचा अधिकाऱ्यांकडू शोध

अविनाश कोळी ।सांगली : मुख्यालयाची इमारत लिलावात विकली गेल्याने अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या कार्यालयासाठी आता जागेचा शोध सुरू झाला आहे. येथील बाडबिस्तारा गुंडाळून बॅँक येत्या महिन्याभरात पर्यायी जागेत कार्यालयाचे स्थलांतर करण्याची तयारी सुरू झाली आहे.

वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचा १० कोटी ७२ लाखांला लिलाव काढला होता. डेक्कन इन्फ्रा या सांगलीच्या निविदाधारकास ही इमारत विक्री करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेने एकूण सहा इमारतींची लिलाव प्रक्रिया राबविली होती. त्यातील चार इमारतींच्या लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची विक्री प्रक्रिया रेंगाळली आहे. मुख्यालयाच्या इमारतीसाठी मोठा प्रतिसाद लाभला आणि या इमारतीची विक्री झाली आहे. बॅँकेचे अवसायनोत्तर कामकाज मुख्यालयातूनच चालत होते.

याठिकाणी अवसायक, व्यवस्थापक व कर्मचारी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कामकाज चालू ठेवले आहे. अद्याप कर्जवसुली आणि ठेवीदारांच्या रकमा देण्याची मोठी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अशा परिस्थितीत मुख्यालयच विकले गेल्याने बॅँकेला येथील बाडबिस्तारा गुंडाळावा लागेल. बॅँकेला आता कामकाजासाठी अन्यत्र कार्यालय स्थलांतरित करावे लागत आहे. त्यासाठी बॅँकेच्या विक्रीस न गेलेल्या अन्य शाखा किंवा मध्यवर्ती ठिकाणी एखादी पर्यायी जागा शोधण्याची वेळ अवसायकांवर आली आहे. त्याची लगबग बॅँकेकडून सुरू झाली आहे.

सांगली-मिरज रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली बॅँकेच्या मुख्यालयाची सुंदर वास्तू बॅँकेच्या हातून गेली आहे. वसंतदादांच्या नावची ही संस्था अवसायनातही किमान नावासहीत उभी होती. आता बॅँकेच्या इमारतीवरील नावही संपुष्टात येईल. बॅँकेच्या अधोगतीचा हा प्रवास अनेकांना वेदनादायी ठरणारा आहे. जिल्ह्याच्या विशेषत: शहराच्या अर्थकारणात कधीकाळी या बॅँकेने योगदान दिले होते. तत्कालीन संचालकांनी नियबाह्य कर्जवाटप, गैरकारभारातून या बॅँकेला हादरे दिले आणि ही बॅँक रसातळाला पोहोचली. बॅँकेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नसुद्धा झाले नाहीत.

कागदपत्रांनी भरली कपाटेचौकशी अधिकारी तसेच अवसायकांकडील कागदपत्रांनी येथील कपाटे भरली आहेत. अन्यत्र ही कागदपत्रे स्थलांतरित करताना मोठ्या जागेची व्यवस्था करावी लागणार आहे. चौकशी अधिकाऱ्यांकडेही मोठ्या प्रमाणावर बॅँकेची कागदपत्रे आहेत. त्याशिवाय अवसायकांकडे बॅँकेच्या आजवरच्या सर्व कागदपत्रांसह, न्यायालयीन प्रकरणे, कर्जदारांच्या मालमत्तांचा तपशील, पत्रव्यवहार, सभा, अहवाल व ठरावांच्या प्रती अशा वेगवेगळ््या प्रकारची लाखो कागदपत्रे येथे आहेत.ताबा प्रक्रियेसाठी महिन्याचा काळलिलाव प्रक्रियेनंतर मुख्यालयाचा ताबा संबंधित खरेदीदारास देण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पार पाडावी लागते. किमान महिनाभर याला अवधी जाण्याची शक्यता आहे. तरीही कार्यालय तसेच येथील कागदपत्रे स्थलांतरित करण्यासाठी बॅँकेकडे कमी कालावधी उरला असल्याने त्यांनी आतापासून पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे.चौकशी अधिकाऱ्यांचीही अडचण : बॅँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी आर. डी. रैनाक करीत आहेत. सध्या चौकशीचे कामकाज ठप्प असले तरी, ती पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. चौकशी अधिकाºयांना मुख्यालयातच जागा दिली आहे. आता त्यांच्यासाठीही पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँक