शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधात सरकारला झुकविण्यासाठी वज्रमुठ, सांगलीत मोर्चा

By संतोष भिसे | Updated: October 22, 2023 15:58 IST

सांगलीत रविवारी खासगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

सांगली : खासगी कंपन्यांना शाळा चालवायला दिल्यास बंद पडतील. याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन २०२४ मध्ये सरकार उलथून पाडण्याचा निर्धार करण्यात आला. सांगलीत रविवारी खासगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखालील बहुजन शिक्षण हक्क विचारमंचाने नेतृत्व केले.

मोर्चामध्ये आमदार सुमनताई पाटील, सत्यजित जाधव, डॉ. भारत पाटणकर, डॉ. बाबुराव गुरव, रावसाहेब पाटील, पृथ्वीराज पाटील, ॲड. सुभाष पाटील, स्वाती शिंदे -पवार, बाळासाहेब होनमोरे आदी सहभागी झाले. पुष्पराज चौकात कर्मवारी भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व क्रांतीची मशाल प्रज्वलित करुन मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद, राम मंदिर चौक, कॉंग्रेस भवन या मार्गे स्टेशन चौकात गेला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक, कामगार, शासकीय कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्टेशन चौकात जाहीर सभा झाली. त्यावेळी विविध वक्त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढविला. लाड म्हणाले, सरकार ऐकत नसले तरी गप्प बसणार नाही. सरकारला ऐकायला लावू. हक्काच्या मोफत शिक्षणासाठी आमचे आंदोलन सुरूच राहील. हे सरकार पैसेवाल्यांचे आहे. संपूर्ण देश अस्वस्थ आहे. भविष्यात यापेक्षा मोठे आंदोलन हाती घ्यावे लागेल. रावसाहेब पाटील म्हणाले, राज्यातील ७५००० शिक्षण संस्था बंद ठेवून सरकारला वटणीवर आणण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. जिल्ह्यातील २५० संस्थाही त्यात सहभागी असतील. धनाजी गुरव म्हणाले, राज्यकर्ते खोटे बोलत आहेत. उत्पन्न वाढूनही शिक्षण, शेतीवर खर्च केला जात नाही. उद्योजकांची, भांडवलदारांची भर केली जात आहे. हे राज्यकर्ते नालायक आहेत. ते स्वातंत्र्य लढ्यावेळी इंग्रजांचे पाय चाटत होते. हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ द्यायचे नाही. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी खासगीकरणाविषयी भूमिका जाहीर करावी.

आंदोलनात डॉ. संजय पाटील, राजेंद्र नागरगोजे, धनाजी गुरव, सुरेश पाटील, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विश्वनाथ मिरजकर, प्रा. शिकंदर जमादार, प्रा. दादासाहेब ढेरे, दिगंबर कांबळे, रोहित शिंदे, उमेश देशमुख, अविनाश पाटील, भगवानराव साळुंखे, व्ही. वाय. पाटील, गोरखनाथ वेताळ, डी. जी. मुलाणी, पी. एन. काळे, अमोल शिंदे हेदेखील सहभागी होते.

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या- खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा- जुनी पेन्शन लागू करा- सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता द्या- किमान वेतन कायद्यात दुरुस्ती करा- बहुजन हिताविरोधातील नव्या शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा- सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण रद्द करा- महिला व अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करा

निवेदन घ्यायला अधिकारी नाहीमोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यांनी येऊन निवेदन स्वीकारावे यासाठी संयोजकांनी वारंवार आवाहन केले. सभा अर्धा तास लांबवली, तरीही कोणी अधिकारी आला नाही. त्यामुळे शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करुन मोर्चा व सभेची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Sangliसांगली