शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
4
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
5
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
6
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
7
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
8
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
9
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
10
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
11
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
12
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
13
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
14
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
15
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
16
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
17
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
18
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
19
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय

वैभवशाली गतिमान विकासाभिमुख नेतृत्व : वैभवदादा शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टीने गावाचा चेहरामोहरा बदलला. ग्रामीण जीवनमान असणाऱ्या आष्टा गावाला ...

स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टीने गावाचा चेहरामोहरा बदलला. ग्रामीण जीवनमान असणाऱ्या आष्टा गावाला शहरीकरणाचे रूप देण्याचे काम स्व. शिंदे साहेबांनी केले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शिंदे साहेबांनी कार्यकर्ता जपला. अशा या संस्कारशील, संवेदनशील घरात मनमिळाऊ आणि दूरदृष्टीचे आशावादी व्यक्तिमत्त्व, वारसा असणारे वैभवदादा विलासराव शिंदे यांचा जन्म १८ एप्रिल १९७१ रोजी झाला.

शिंदे घराण्याचा वारसा आणि कै. काकासाहेब शिंदे यांच्याप्रमाणे जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे आणि स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या विचाराचा व राजकीय, सामाजिक, कौटुंबिक जाणिवांचा ठेवा जपणारे नवतरुणांचे आशावादी नेतृत्व म्हणून वैभव (दादा) शिंदे परिचित आहेत. युवकांचे आशास्थान, सर्वसामान्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करणारे वैभव (दादा) शिंदे आज आष्टावासीयांसाठी दीपस्तंभ म्हणून कार्यरत आहेत.

स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्यानंतर आष्टा शहराला कोणतीही उणीव भासू न देता रात्रंदिवस कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून सर्वांना आधार देऊन स्व. शिंदे साहेबांची उणीव भासू देत नाहीत. जनतेच्या समस्या सोडवण्याचे कसब शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून वैभव दादांनी आत्मसात केले आहे. गरीब असो की श्रीमंत यांच्यात भेदभाव न करता किंवा कोणत्या राजकीय पक्षाचा आहे याचा विचार न करता पारदर्शकपणे काम करताना ते वेळेचे भान ठेवत नाहीत. कामाचा उरक आणि आवश्यक ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ निर्णय घेऊन कामातील अडचणी दूर करत आहेत.

वैभव दादांचा स्वभाव आणि त्यांची माणसातील संवेदना जाणून घेण्याच्या वैशिष्ट्यामुळे जवळ येणारा माणूस आनंदी मनाने परतत असताना पाहायला मिळतो.

सन्मान देणे आणि सन्मान करणे हे वडीलकीचे संस्कार दादांनी जपले आहेत. त्यामुळे छोटा आहे की मोठा, हे न पाहता सर्वांच्या कार्यकर्तृत्वाचा नेहमीच सन्मान करतात. त्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्याला अथवा जनसामान्यांना कौतुक वाटत आहे.

वैभव दादांना लाभलेले बाळकडू त्यामुळे शिक्षण, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःहून सक्रिय होऊन ते त्यातील एक होऊन जातात. उपक्रमातील अथवा कार्यक्रमातील एक होऊन ते कार्यरत असतात. कार्यकर्त्याला वेगळा न समजता तो आपल्या बरोबरचा आहे, अशी वागणूक देऊन विश्वासार्हता निर्माण करतात.

वैभवदादा हे कार्यकर्त्यांचे आनंदाचे सार आहे. स्व. विलासराव शिंदे साहेबांचे व्यक्तिमत्त्व कुठेही असले तरी त्यांचे वेगळेपण वाखाणण्यासारखे होते. तसे वैभवदादांचे व्यक्तिमत्त्वही निश्चितच दिशा देणारे आहे. आष्टा शहरवासीय वैभवदादांकडे स्व. विलासराव शिंदे साहेब यांचे प्रतिरूप पाहत आहेत.

कोविड महामारीमध्ये स्वतः पुढे होऊन आष्टा शहर व परिसरातील सर्व गावातून त्यांनी लोकांना धीर दिला. सुरक्षित कसे राहता येईल याच्या उपाययोजनांबाबत उद्बोधन करून मास्क, होमिओपॅथिक औषध देऊन लोकांना सजग केले आहे. स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले असताना ते त्यातून सुखरूप बाहेर येऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी न घाबरता तयार झाले. पुन्हा जनजागृती करून अनुभवातून लोकांना जगण्यासाठी प्रेरित केले. असा हा कोविड योद्धा म्हणजे वैभवदादा शिंदे!

वैभवदादांनी स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पासून राजकीय, सामाजिक कामाला सुरुवात केली. प्रथमत: सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत युवकांमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची गोडी निर्माण केली. संघटन कौशल्य विकसित केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीसपद स्वीकारून काम केले. २००२ मध्ये पंचायत समिती निवडणूक लढवून सदस्य म्हणून काम केले. २००७ ते २०१२ पर्यंत पंचायत समितीमध्ये उपसभापती म्हणून कार्य केले. या काळात त्यांनी तालुक्यात शैक्षणिकदृष्टीने बदल घडवून आणून युवकांना, नवतरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले. अनेक उपक्रम हाती घेऊन, शिबिरे घेऊन सर्वसामान्य लोकांना त्याचा उपयोग करून दिला. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, जनावरांची तपासणी शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम, रोप वाटप उपक्रम, आर.टी.ओ. कॅम्प यांचा समावेश होता. स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्या स्वप्नातील आष्टा तहसील कार्यालयायासाठी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तीस वर्षांनंतर आष्टा शहराला व जवळच्या ग्रामीण गावासाठी अप्पर तहसील कार्यालयाची मंजुरी मिळवली. १० जुलै २०१८ रोजी तहसील कार्यालय सुरू केले. आष्टा तहसील कार्यालयाचे कार्यालय उभारणीचे शिल्पकार वैभव (दादा) शिंदे आहेत.

स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या नंतर राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. अतिशय जाणीवपूर्वक आणि संवेदनशीलपणे आशावादी दृष्टीने शैक्षणिक काम करत आहेत. वाळवा तालुक्यातील आष्टा शहरवासीयांची स्वप्नपूर्ती करणारे युवकांचे गतिमान, विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व असणाऱ्या वैभवदादा शिंदे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचालीस वैभवशाली हार्दिक शुभेच्छा!

- डॉ. एल. बी. कुरणे (सर), बहादूरवाडी, आष्टा