सांगली : कोरोनाची लस शुक्रवारीदेखील आलेली नाही, त्यामुळे शनिवारी लसीकरण बंद राहणार आहे. शिल्लक लसीतून काही जणांना दुसरा डोस दिला जाईल. शुक्रवारी दिवसभरात २,२४९ जणांचे लसीकरण झाले. यामध्ये १,७९२ जणांना पहिला डोस, तर ४५७ जणांना दुसरा डोस देण्यात आला. विशेष म्हणजे १६२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी व २६७ फ्रंटलाइन वर्कर्सनीही आज पहिला डोस घेतला. गेल्या पाच महिन्यांत त्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली होती. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील फक्त १४० जणांना दुसरा डोस मिळाला. महापालिका क्षेत्रात ५६७ जणांचे लसीकरण झाले.
दरम्यान, आज चौथ्या दिवशीही लस मिळालेली नाही. प्रशासन लसीसाठी वरिष्ठांशी दररोज संपर्कात आहे. शनिवारीदेखील लस मिळणार नाही, त्यामुळे लसीकरणात खंड पडला आहे.