दिघंची: पुजारवाडी दिघंची, ता. आटपाडी येथे पहिल्यांदाच लसीकरण सुरु झाले आहे. गुरुवारी पुजारवाडी, पांढरेवाडी, भवानीमळा या परिसरातील ३० नागरिकांनी लस घेतली. दिघंची प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुजारवाडीला उपकेंद्र मंजूर असून, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक यांची नेमणूक आहे.
बुधवारी एकाच दिवशी कोरोनाचे १६ रुग्ण सापडले आहेत. उपकेंद्र मंजुरीपासून सुरू नसल्याने या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. तहसीलदार सचिन मुळीक यांनी पुजारवाडीत उपकेंद्र सुरु करून नागरिकांची तपासणी व लसीकरण करावे, असे आदेश दिले होते. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने गेल्या चार दिवसांपासून तपासणी चालू केली. गुरुवारी लसीकरण सुरु केले आहे.
यावेळी पुजारवाडीच्या सरपंच अनिता होनमाने, ब्रम्हदेव होनमाने, किरण मिसाळ, वैद्यकीय अधिकारी प्रवीण गुरव, पी. एस. जमदाडे, आरोग्यसेविका पल्लवी रणदिवे, मधुकर मिसाळ, विलास मोरे, उत्तम शिंदे, अर्चना दुबुले आदी उपस्थित होते.