कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) आयुर्वेदिक उपकेंद्रात शुक्रवार, १ एप्रिल रोजी २०० लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. शुक्रवारी मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे शनिवारीही हे लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलीकर यांनी दिली.
यापूर्वी नागरिकांना कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी लागत होती. आज पहिल्या दिवशीच लस घेणाऱ्यांत पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक डॉ. प्रकाश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष एस. आर. पाटील, डॉ. सचिन पाटील, वाळवा पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मदने, शंकर पाटील यांचा सामावेश होता. ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींना लसीकरण केंद्रावर ने -आण करण्यासाठी हौसेराव शेवाळे यांनी वाहन उपलब्ध करून दिले. नागरिकांनी येडेनिपाणी आरोग्य उपकेंद्रात सकाळी ९ ते ५ या वेळेत लसीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कामेरीसह अन्य ५ गावांतील १०४ नागरिकांनी लस घेतली.