शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

उटगी ग्रामंचायत निवडणुकीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

माडग्याळ : जत पूर्व भागातील उटगी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप व काँग्रेसमध्ये मुख्य लडत ...

माडग्याळ : जत पूर्व भागातील उटगी ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीने होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजप व काँग्रेसमध्ये मुख्य लडत असून नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उटगी ग्रामपंचायतीवर तालुक्यातील काँग्रेस व भाजपच्या नेत्यांची विशेष लक्ष आहे. त्यात कोण बाजी मारणार हे १८ जानेवारीला समजणार आहे.

उटगी येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिरादार व काँग्रेसचे भिमराय बिरादार या दोन नेत्यांचे गट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे आहेत. भाजपमध्ये काही नाराज अपक्ष म्हणून ऩिवडणुकीत उतरण्याची तयारी केली असली तरी त्यांना बसवराज बिरादार शांत करण्यात य़शस्वी होतात.

उटगीत गेल्या दहा वर्षांपासून भिमराय बिरादार यांची एकहाती सत्ता आहे, तर १० वर्षांपूर्वी भाजपचे बसवराज बिरादार यांनी २० वर्षे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता ठेवली होती. काँग्रेसचे भिमराय बिरादार यांनी २० वर्षे बसवराज बिरादार यांच्या विरोधात लढून सत्ता न मिळाल्याने २०१० मध्ये बसवराज बिरादार यांनी भिमराय बिरादार यांना आपल्या गटात घेऊन सरपंच पदाची माळ त्यांच्या गऴ्यात घातली. मात्र, २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भिमराय बिरादार यांनी बसवराज बिरादार यांना पुन्हा विरोध करून एकहात्ती सत्ता मिळविली. दरम्यानच्या काळात स्थानिक सोसायटीच्या निवडणुकीत बसवराज बिरादार यांच्या पॅनेलला बहुमत मिळाले.

चाैकट

भावकी अन् पै-पाहुण्यांचे राजकारण

आता ग्रामपंचायत निवडणुकीत भिमराय बिरादार यांच्या गटातील काही मंडळी बसवराज बिरादार यांच्या गटात सामील झाले आहेत; तर बसवराज बिरादार गटातील काही नाराज भिमराय बिरादार यांच्या गटातून उमेदवारी मिळवून निवडणुकीत उभे आहेत. येथे भावकी व पै पाहुण्यांचे राजकारण चालणार आहे. इतर समाज आहे; परंतु दोन्ही गटांत विभागले जाऊन त्यांचा प्रभाव कमी दिसृून येतो. यामुळे निवडणूक चुरशीने होणार यात शंका नाही.