उमदी ते जत रस्त्यालगत उटगी बसस्थानक परिसरातील रवींद्र कोळी यांचे मोबाईल दुकान चोरट्यांनी शटर उचकटून फोडले. दुकानामधील सीसीटीव्ही संच, संगणक, लॅपटॉप, ३२ अँड्रॉइड मोबाईल, दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दिलेले ५० मोबाईल असा तीन ते साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. जवळच असलेल्या शाकीर मुल्ला यांची पानटपरी फोडून दुकानातील तंबाखू, सिगारेटसह किमती वस्तू चोरल्या. खुतबुद्दीन मुल्ला यांचे हॉटेल फोडून तेलाची पाकिटे व इतर साहित्य लंपास केले. शांतप्पा लिगाडे यांचे बेकरी दुकान फोडून खाद्यपदार्थ पळवले. चार दुकानांत चार लाखांची चोरी झाली आहे.
उटगी परिसरात अचानक घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत व बसस्थानक परिसरातील व्यावसायिक पट्ट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.