शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बोलवाड आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा वापर

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

साठा ताब्यात : सभापतीकडून कारवाई

टाकळी : बोलवाड (ता. मिरज) येथील आरोग्य उपकेंद्रात कालबाह्य झालेली चार प्रकारची औषधे वापरत असल्याचे आढळल्याने मिरज पंचायत समितीच्या सभापतींसह सदस्यांनी कालबाह्य औषधांचा साठा ताब्यात घेतला. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रांमधील आरोग्य उपचाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्याने मिरज पंचायत समिती सभापती दिलीप बुरसे व सदस्यांनी आरोग्य केंद्रांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. या भेटीदरम्यान रुग्णांची नोंदवही, प्रसुती उपचार केले जातात का, यासह इतर उपचारांबरोबर कर्मचारी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्यास असतात का याची माहिती घेतली जात आहे. मालगाव येथील डेग्यू साथीची माहिती घेऊन सभापती दिलीप बुरसे, विरोधी पक्षनेते अरुण राजमाने, सदस्य सतीश निळकंठ यांनी बोलवाड उपकेंद्रास भेट दिली. त्यांनी उपकेंद्राच्या कारभाराची चौकशी करताना रुग्णांना उपचारासाठी व वापरात असणाऱ्या औषधांमध्ये २०१३ ची व्हिटॅमिनसह चार प्रकारची कालबाह्य झालेली औषधे आढळून आली. कालबाह्य औषधे नष्ट न करता ती वापरत असलेल्या साठ्यात सापडल्याने पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे व सदस्यांनी ताब्यात घेऊन तालुका वैद्यकीय कार्यालयातील आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन चौकशी करण्याची व कारवाईचे आदेश दिले. मिरज तालुक्यातील आरोग्य केंद्रांना पंचायत समितीचे पदाधिकारी भेटी देऊ लागल्याने तेथील गैरकारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे. या भेटीने आरोग्य कर्मचाऱ्यांतही खळबळ माजली आहे. (वार्ताहर)आरोग्य सेविका मोहिमेवर बोलवाड उपकेंद्रास सभापती व सदस्यांनी भेट दिली असता, तेथील कारभार सांभाळणाऱ्या आरोग्य सेविका या मालगाव येथील साथीच्या सर्वेक्षण मोहिमेत सहभागी असल्याने पदाधिकाऱ्यांना जाब विचारता आला नाही. कालबाह्य औषधे ताब्यात घेऊन तालुका आरोग्य विस्तार अधिकाऱ्यांकडे देण्यात आली.