शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

घाटकोपर दुर्घटनेनंतर सांगलीतील होर्डिंगचे तातडीने ऑडिट, महापालिका आयुक्तांकडून आदेश

By अविनाश कोळी | Updated: May 14, 2024 16:17 IST

अनधिकृत होर्डिंग हटणार  

सांगली : मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेत चौदाजणांचा बळी गेल्यानंर सांगली, मिरज व कुपवाड शहरातील होर्डिंगच्या ऑडिटला सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण २९७ होर्डिंग कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठेकेदाराला तसेच महापालिकेच्या मालमत्ता विभागाला देण्यात आले आहेत. महापालिकेमार्फत अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याच्या कारवाईलाही सुरुवात झाली आहे.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी होर्डिंगबाबत मंगळवारी मालमत्ता विभागाला शोधमोहिमेचे आदेश दिले. तिन्ही शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आहे. होर्डिंग ठेकेदाराला सर्व फलकांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळण्याचे प्रकार यापूर्वी सांगलीत अनेकदा घडले आहेत. मात्र, त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. भविष्यात कोणतीही दुर्घटना या माध्यमातून होऊ नये, यासाठी महापालिकेने सतर्कता बाळगली आहे.सांगलीत पाया दहा फुटांपर्यंतमक्तेदार रावसाहेब मोरे यांनी सांगितले की, सांगलीत मोठ्या होर्डिंगचा पाया दहा फुटांपर्यंत खोदून भक्कम करण्यात येतो. महापालिका क्षेत्रातील सर्वच होर्डिंगच्या पायाभरणीची पाहणी महापालिकेच्या अभियंत्यांनी करुन नंतर नाहरकत दिली आहे. तरीही चाैक व मुख्य रस्त्यांवरील होर्डिंगच्या पाया व सांगाड्याची आम्ही पुन्हा तपासणी करीत आहोत, असे मोरे यांनी सांगितले.

चालू वर्षाचे ऑडिट पूर्णसांगली, मिरज, कुपवाड या शहरांमधील होर्डिंगचे चालू वर्षाचे ऑडिट अहवाल सादर झाल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापकांनी दिले. तरीही आता दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. ठेकेदारानेही स्वतंत्रपणे तपासणी सुरु केली आहे.

मक्तेदार संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट होणार असले तरी त्रयस्थपणेही होर्डिंगची तपासणी केली जाईल. धोकादायक व अनधिकृत होर्डिंग हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तातडीने शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. - शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका

टॅग्स :Sangliसांगली