शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरास, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:36 IST

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने दिली होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेत नियमित कर्जदारांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरसकट कर्जमाफीची वल्गना करणाऱ्या शासनाकडून नियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरास झाल्याची भावना आहे. सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन अंमलात आणावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देनियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरासशेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने

दत्ता पाटील तासगाव : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची आश्वासने दिली होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेत नियमित कर्जदारांना कोणताच फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरसकट कर्जमाफीची वल्गना करणाऱ्या शासनाकडून नियमित कर्जदारांचा सरसकट भ्रमनिरास झाल्याची भावना आहे. सरकारने सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन अंमलात आणावे, अशी मागणी होत आहे.भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक निकष आणि अटींद्वारे कर्जमाफी केली होती. त्यामुळे कर्जमाफीपासून बहुतांश शेतकरी वंचित राहिले होते. विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी , काँग्रेसच्या नेत्यांनी सात-बारा कोरा करण्याची आश्वासने दिली होती.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर सत्तेतील नेत्यांकडून सात-बारा कोरा करण्याचे संकेतही मिळत होते. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून सात-बारा कोरा करण्याच्या घोषणेऐवजी सप्टेंबरअखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाली.  मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे केवळ थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे.मात्र नियमित शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अस्मानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांनी स्वत:ची पत टिकविण्यासाठी सोने विकून, गहाण टाकून कर्जाची फिरवाफिरवी करून नियमित राहण्याचा प्रयत्न केला होता.

नियमित कर्जदारांमुळेच बहुतांश सहकारी संस्था टिकून राहिलेल्या आहेत. मात्र या शेतकऱ्यांनाच शासनाने कोलदांडा दाखवला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या या भूमिकेविरोधात नियमित कर्जदार शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. सरकारने केलेल्या घोषणेनुसार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अन्यथा सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी करून नियमित कर्जदारांना लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली