शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पूर नुकसानीच्या पाहणीसाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:57 IST

सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) चे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये त्यांच्या सोबत गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजिविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर, अविनाश कुमार यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसंयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथक जिल्ह्यात दाखलजिल्हाधिकारी कार्यालयात विविध यंत्रणांसोबत बैठक

सांगली : सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पुनर्प्राप्ती सल्लागार डॉ. कृष्णा वत्स यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) चे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. यामध्ये त्यांच्या सोबत गृहनिर्माण तज्ज्ञ पी. के. दास, उपजिविका तज्ज्ञ हेमंत वाळवेकर, अविनाश कुमार यांचा समावेश आहे.या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व विविध यंत्रणांसोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, महानगरपालिका उपायुक्त राजेंद्र तेली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात 1 जून ते 10 ऑगस्ट दरम्यान झालेला पाऊस, कोयना व वारणा धरणातून झालेला विसर्ग, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज या तालुक्यांतील 104 गावांसह सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात पुरामुळे झालेले नुकसान, पायाभूत सुविधा व कृषि क्षेत्राचे नुकसान आदिंबाबत माहिती दिली.

महापुराच्या काळात 87 हजार 814 कुटुंबे बाधित झाल्याचे सांगून वारंवार पुरामुळे नुकसान होणाऱ्या कुटुंबांचे त्यांच्या सहमतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पूरबाधित क्षेत्रातील 1 हजार 883 कि.मी. लांबीचे रस्ते, 39 पूल, जिल्ह्यात एकूण 21 हजार 797 घरांचे नुकसान झाले असून यामध्ये 4 हजार 699 घराचे पूर्णत: तर 6 हजार 131 घरांचे मोठ्या प्रमाणावर तर 10 हजार 967 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात 54 हजार 549 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय पशुधन, पाणीपुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, पोलीस स्टेशन व निवासस्थाने, आरोग्य, ग्रामपंचायत विभागाकडील, उद्योग विभागाकडील व अन्य पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली.पूरप्रवण क्षेत्रातील रस्त्यांची उंची वाढविणे, पूरप्रवण गावे, शहरांमध्ये पूराच्या काळात कमीत कमी एक रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहील यासाठी नियोजन करणे, आवश्यक त्या ठिकाणी पुलांची उंची वाढविणे, विजेच्या खांबांची उंची वाढविणे आदिंबाबत उपाययोजना करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.या सादरीकरणानंतर समितीच्या सदस्यांनी उपाययोजनांबाबत चर्चा केली. ग्रामीण व शहरी भागासाठी जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा सक्षम असावा. आराखडे तयार करताना नदी व नदीकाठ यांच्यापासून सुरूवात करावी. ज्या ठिकाणी कुटूंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येत आहे त्या ठिकाणी दर्जेदार पायाभूत सुविधाही द्याव्यात. सखल भागात आपत्ती काळात माहिती पोहोचविण्यासाठी सक्षम संवाद यंत्रणा असावी.

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना उपजिविकेच्या दृष्टीने अधिकाधिक संधी उपलब्ध होतील या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पूरप्रवण क्षेत्रातील लहान लहान गावांमध्येही आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करावेत आदि मार्गदर्शक सूचना संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) कडील पथकाने केल्या. युएनडीपीच्या पथकाने आज सांगली शहरासह जिल्ह्यातील काही भागात पाहणी केली. हे पथक उद्याही काही भागात भेट देवून पाहणी करणार आहे. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली