शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:25 IST

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका ...

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर होत्या.सबनीस म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. मराठी भाषकांवर सुरू असलेल्या अन्यायाबाबत साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला पाहिजे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत तेथे राष्टÑपती शासन लागू करण्यात यावे.ते म्हणाले, समाजात रूंदावणारी धर्म व जातीची दरी नष्ट झाली पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. शेतकरी दुर्लक्षित आहेत. कोणीच त्यांना खºयाअर्थाने न्याय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, स्त्रियांच्या लेखनाचा मूळ पाया लोकवाड़मय आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेविरूध्द तिने आवाज उठविला आहे. लोकसाहित्यातून स्त्रीने स्वातंत्र्य मागण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य व स्त्रीसाहित्य असा भेद न करता, समाजाच्या वेदना व समकालीन प्रश्नांना वाचा फोडणाºया लोकसाहित्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. ‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात डॉ. राजेंद्र कुंभार व प्रा. अविनाश सप्रे सहभागी होते. गुरव म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. समोर जळतंय, त्यावर लेखकाचे मत महत्त्वाचे आहे. वादाच्यावेळी कलावंत व लेखक हा सामान्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. कोणाला तरी चांगले वाटण्यासाठी लिहिण्यापेक्षा सत्ताधाºयांशी संघर्ष करणारा सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, सामाजिक गरजेतून अभिव्यक्ती निर्माण होते. स्वातंत्र्य कशासाठी, हे ओळखले पाहिजे. लोकप्रिय लेखनापेक्षा समाज ढवळणाºया व प्रक्षोभ निर्माण करणाºया साहित्यातून समाजपरिवर्तन होईल.डॉ. कुंभार म्हणाले, लिहिण्याचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा आहे. कोरेगाव-भीमा संघर्ष, शेतकºयांच्या समस्या साहित्यातून उमटल्या पाहिजेत.धनदत्त बोरगावे यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सीमाभागातील कवी सहभागी होते. ‘मोक्ष’ हे सांगली विभागीय राज्य नाट्य स्पर्धेतील परितोषिक प्राप्त नाटक सादर करण्यात आले. प्रतिभा जगदाळे, (चंदनवृक्ष), अरुण इंगवले (अबूट घेºयातील सूर्य), आप्पासाहेब पाटील, (तडजोड) आणि डॉ. व्ही. एन. शिंदे (एककांचे मानकरी) यांना श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते चैतन्य शब्दांगण साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, संस्थापक, अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्रा. वैजनाथ महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष गणेश माळी यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले. शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी आभार मानले. साहित्य व नाट्यरसिकांचा संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला.