शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गदिमांच्या स्मारकासाठी साहित्याचा अखंड जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:57 IST

G D Madgulkar, Sangli, culture ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी त्यांच्याच साहित्याचा जागर करत शासनाला स्मरण करून देणारे अभिनव आंदोलन साहित्यिकांनी सोमवारी केले. पुण्यासह माडगुळे व शेटफळे येथे स्मारकाला गती मिळावी यासाठी दिवसभर साहित्यजागर केला. साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आवाज उठविला. प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनिल मडके, शिवराज काटकर यांनी स्मारकांच्या कामाला गती देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देगदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिक एकवटलेपुण्यासह माडगुळे, शेटफळेमध्ये स्मारकासाठी वज्रमूठ

सांगली : ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकासाठी त्यांच्याच साहित्याचा जागर करत शासनाला स्मरण करून देणारे अभिनव आंदोलन साहित्यिकांनी सोमवारी केले. पुण्यासह माडगुळे व शेटफळे येथे स्मारकाला गती मिळावी यासाठी दिवसभर साहित्यजागर केला. साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आवाज उठविला. प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनिल मडके, शिवराज काटकर यांनी स्मारकांच्या कामाला गती देण्याची मागणी केली.या अभिनव आंदोलनात प्रमोद चौगुले, प्रा. एम. एस. राजपूत, नामदेव माळी, संजय पाटील, डॉ. स्वाती शिंदे-पवार, प्रकाश बिरजे, तानाजी बोराडे, नीलम माणगावे, प्रा. उज्ज्वला केळकर, प्राचार्य डी. जी. कणसे, चंद्रकांत देशमुखे, हरिभाऊ कुलकर्णी, राजेंद्र पोळ, नंदू गुरव आदींनी सहभाग नोंदविला. गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या पुढाकाराने राज्यभरात ठिकठिकाणी सोमवारी एकाच दिवशी कविता वाचनाद्वारे जनआंदोलने झाली.प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी जनआंदोलनाची पार्श्वभूमी विशद केली. अर्चना मुळे, डॉ. दीपाली वाळवेकर, ज्योती पाटील, डॉ. प्रांजली माळी, अस्मिता इनामदार, सारिका मुळ्ये यांनी काव्यवाचन केले. त्यानंतर साहित्यिकांनी गदिमांच्या कविता, गाण्यांचा अभिषेक घातला.प्रा. धनदत्त बोरगावे, बाबा परीट, प्रा. संतोष काळे, सुहास पंडित, प्रा. अनिलकुमार पाटील, प्रा. निर्मला लोंढे, महेश कोष्टी, निलांबरी शिर्के, संपत कदम, बजरंग आंबी, प्रतिभा जगदाळे, सुनीता बोर्डे, प्रा. संजय ठिगळे, सदानंद माळी, अश्विनी कुलकर्णी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, शाहीर चंद्रकांत गायकवाड, रघुराज मेटकरी, मुबारक उमराणी, भीमराव कांबळे, नितीन माळी, विनायक कदम, दत्तात्रय सपकाळ, नाना हलवाई, रणजित मगदूम, मारुती नवलाई, प्रकाश कुलकर्णी, श्रीशैल्य चौगुले, योगेश मेटकरी आदींनी कविता, बालगीते, चित्रपटगीते, लावणी आदी साहित्यप्रकार सादर केले.यावेळी संयोजक महेश कराडकर म्हणाले, आंदोलनाच्या निमित्ताने साहित्यिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. भविष्यातही एकजूट कायम राखत विधायक उपक्रम राबविण्यात येतील. नामदेव भोसले, अभिजित पाटील, दयासागर बन्ने, गौतम कांबळे, वर्षा चौगुले आदींनी संयोजन केले.लेखनाचे दालन उभारणारजिल्ह्यातील लेखक, कवी यांच्या विविध विषयांवरील लेखांच्या प्रतींचे दालन यशवंतराव चव्हाण ग्रंथालयात उभारण्यात येणार आहे, या उपक्रमालाही प्रतिसाद मिळाला. पुण्यात गदिमा यांच्या स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याच्या तेथील महापौरांच्या घोषणेचे आंदोलनात स्वागत करण्यात आले. 

टॅग्स :G D Madgulkarग. दि. माडगूळकरSangliसांगलीcultureसांस्कृतिक