शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:01 IST

मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत.

ठळक मुद्देविक्रमी भाव : किलोचा दर १८0 रुपयांवरून गेला २२० रुपयांवर; सांगलीत मधुमेही रुग्णांकडून वाढती मागणी

सचिन लाड ।सांगली : मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत. त्यामुळे आता ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी’, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून बाजारपेठेत जांभळाची आवक सुरू झाली आहे. जिल्ह्यात प्रमुख मार्गांवर जांभाळाचे स्टॉल्स् सजले असून मुख्य बाजारांमध्येही जांभळे मोठ्या प्रमाणावर विक्रीस आले आहेत. मधुमेही रुग्णांकडून जांभळास मागणी होऊ लागल्याने दर वाढले आहेत. यंदा जांभळाचा दर २२० रुपये किलोपर्यंत गेला आहे. यामध्ये आणखी दरवाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली. सांगलीत कोकण परिसरातून आवक होत असते. यावर्षी चांदोली, सावंतवाडी येथून जांभळाची आवक सुरू झाली आहे. कुपवाडमधूनही आवक आहे. आवक कमी असून मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधूनही किरकोळ प्रमाणात जांभूळ विक्रीसाठी येत असले तरी मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी आहे. यापूर्वी बालगोपाळांकडून जांभळाला मागणी असे. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांकडूनही मागणी होत आहे.

सांगलीत राममंदिर चौक, बालाजी चौक, मारुती चौक, सिव्हिल चौक, विश्रामबागला रस्त्याकडेला जांभूळ विक्रीसाठी विक्रेते बसतात. काळी व आकाराने मोठी असलेली जांभळे आकर्षिक करीत आहेत. मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुर्वेदामध्ये जांभूळ फळ व त्याच्या बियांची पूड मधुमेहावर उपचार करते, असे सांगितले जात असल्याने जांभळाला मागणी वाढली आहे. गतवर्षी दर १८0 ते १९0 रुपये किलो होता. तो यावर्षी २२० रुपयांच्या घरात गेला आहे.जांभूळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. जांभूळ मधुमेहावर गुणकारी असल्याचे अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक जांभूळ खरेदीस येत आहेत. येत्या पंधरवड्यात आवक न वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पचनशक्तीसाठी गुणकारकजांभूळ, पेरूमुळे पचनशक्ती वाढते, पोट साफ होते. त्यामुळे शरीरातील साखर वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण येते. जांभूळ साखर कमी करण्यासाठी थेट परिणाम करते. पण यास अजून तरी वैज्ञानिक मान्यता नाही. वर्षातून उन्हाळ्यातच हे फळ खायला मिळते. याची गोडी कमी असली तरी, औषधी गुणधर्मामुळे मागणी वाढत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार