शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरमध्ये शिवसेनेत अंतर्गत संघर्ष

By admin | Updated: July 19, 2015 23:43 IST

जुन्या-नव्या गटात ठिणगी : आमदारांनी जुन्या शिवसैनिकांना दाखविला ‘कात्रजचा घाट’

दिलीप मोहिते - विटा -गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले खानापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी जुन्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याने, शिवसेनेत आता जुना व नवा गट कार्यरत झाला आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगावचे तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांनी, आमदारांनी जुन्या शिवसैनिकांना डावलल्याची नाराजी व्यक्त करीत आ. बाबर यांच्या कार्यपध्दतीबाबत वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, खानापुरात आता शिवसेनेच्या जुन्या व नव्या गटाच्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.खानापूर मतदारसंघातील तत्कालीन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल बाबर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेत आमदारपदी संधी मिळविली. मात्र, मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वाईट काळात ज्यांनी पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या शिवसेनेच्या जुन्या पदाधिकारी व शिवसैनिकांना आ. बाबर यांनी निवडून आल्यापासून अलिप्त ठेवले असल्याची तक्रार जुन्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते यांनी विटा येथे दि. २५ एप्रिल रोजी संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत घेतलेल्या सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बानुगडे-पाटील यांच्यासमोरच आ. बाबर यांच्यावर विभुते यांनी हल्ला चढवित त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.एवढेच नव्हे, तर या मेळाव्याला आ. बाबर समर्थक एकही कार्यकर्ता हजर नव्हता. त्यामुळे आ. बाबर हे मतदारसंघात पक्षवाढीसाठी काहीही काम करीत नसल्याची तक्रार विभुते यांनी भर मेळाव्यात केली होती. तेव्हापासून खानापूर तालुका शिवसेनेत खऱ्याअर्थाने संघर्षाची ठिगणी पडल्याचे दिसून आले. आटपाडी तालुक्यातही काही गावात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्यात आल्या. परंतु, त्याठिकाणीही आ. बाबर समर्थक नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पक्षाचे आमदार असून, अडचण, नसून खोळंबा असल्याचे वक्तव्य विभुते यांनी मेळाव्यात केले होते. सध्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे आ. बाबर यांनी कॉँग्रेसचे मोहनराव कदम, भाजपचे माजी आ. पृथ्वीराज देशमुख यांच्याशी युती केली. त्यावेळी खानापूर तालुकाप्रमुख संजय विभुते व कडेगाव तालुकाप्रमुख सुभाष मोहिते यांना आ. बाबर यांनी विचारात घेतले नाही. त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्या महायुतीशी हातमिळवणी केली. परंतु, ही हातमिळवणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंतच टिकून राहिली. कारण, पक्ष आदेशानुसार विभुते व मोहिते यांच्यावर बाजार समितीच्या समर्थक उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची वेळ आली. त्याचदिवशी आ. बाबर यांच्याविरोधात पत्रक काढून पक्षाच्या आमदारांना (अनिल बाबर) जुन्या पदाधिकारी व शिवसैनिकांविषयी आस्था नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या निवडणुकीबाबतचा सर्व अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे विभुते व मोहिते यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जुन्या गटाला आ. बाबर यांनी कोणत्याही प्रकारे विचारात न घेतल्याने आता शिवसेना पक्षात जुना व नवा गट या वादाच्या संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.जिल्हा उपप्रमुखांच्या भूमिकेकडे लक्ष गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणून विट्याचे शिवाजी शिंदे काम पाहत आहेत. विद्यमान आ. अनिल बाबर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावेळी त्यांनी केलेले काम शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाचे उमेदवार आ. बाबर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारली होती. सध्या शिवसेनेत आता जुन्या व नव्या गटाचा वाद उफाळून येत असताना, जिल्हा उपप्रमुख शिंदे यांची भूमिका काय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु, शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, आ. बाबर हे पक्षाचे आमदार असून, त्यांच्या नेतृत्वाखालीच सर्वांना काम करावे लागेल. पक्षात जुना व नवा गट वाद खपवून घेतला जाणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.