शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

साकेत कांबळेचा शिरविरहित मृतदेह कणेगावजवळ सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:46 IST

इस्लामपूर : येथील बांधकाम सुपरवायझर साकेत किरण कांबळे (वय ३२) याचे शिर आणि एक हात नसलेले धड तब्बल दहा ...

इस्लामपूर : येथील बांधकाम सुपरवायझर साकेत किरण कांबळे (वय ३२) याचे शिर आणि एक हात नसलेले धड तब्बल दहा दिवसांनी सोमवारी सकाळी कणेगावच्या जुन्या पुलाजवळ मिळून आले, तर चिकुर्डे पुलाजवळून गुन्ह्यात वापरलेली धारदार पारळीही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सांगली महापालिकेच्या दोन यांत्रिक बोटी आणि कोल्हापूर येथील जीवरक्षक दलाच्या मदतीने ही शोधमोहीम राबविण्यात आली. डीएनए चाचणीसाठी साकेतच्या शरीराचे नमुने घेण्यात आले आहेत.आर्थिक देवघेवीच्या कारणातून मुख्य संशयित संतोष ज्ञानू पवार व त्याचा सहकारी अनिकेत गणेश पानिरे या दोघांनी १७ नोव्हेंबरच्या रात्री साकेत कांबळे याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे शिर आणि एक हात धडावेगळा केला. गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड आणि धारदार पारळी या शस्त्रांसह शीर आणि हात चिकुर्डेच्या पुलावरुन वारणा नदीच्या पाण्यात टाकला, तर धड कणेगावजवळील पुलावरुन पाण्यात टाकण्यात आले होते.या घटनेचा उलगडा झाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किशोर काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या ३ दिवसांपासून अथकपरिश्रम घेत शोधमोहीम राबविली. रविवारी लोखंडी रॉड मिळाला, तर सोमवारी त्याचे शिरविरहीत धड आणि पारळी मिळून आली. ही घटना समजताच साकेतच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे सर्वांनाच शोक अनावर झाला होता.साकेतच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर जाग्यावरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा मृतदेह साकेतच्या कुटुंबियांनी स्वीकारला. डीएनए चाचणीसाठी त्याच्या शरीराचे नमुने घेण्यात आले आहेत. या शोधमोहिमेत सांगली महापालिकेच्या दोन यांत्रिक बोटी आणि कोल्हापूरच्या जीवसंरक्षक दलातील दिनकर देसाई व त्यांच्या सहकाºयांनी भाग घेतला. इस्लामपूर व कुरळप पोलिसांची पथकेही या शोधमोहिमेत सहभागी झाली होती. पोलीस उपअधीक्षक किशोर काळे अधिक तपास करत आहेत.