शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

उमेदवारीवरून सांगली कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

प्रक्रियेचा वाद : मदनभाऊंच्या थेट घोषणेने नाराजी

अविनाश कोळी ल्ल सांगलीआगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच देव पाण्यात घातले असले, तरी मदन पाटील यांची उमेदवारी आधीच निश्चित करण्याच्या प्रकाराने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघात रितसर प्रक्रियेद्वारे उमेदवारी निश्चितीचा कार्यक्रम आखला जात असताना सांगलीसाठीच वेगळा न्याय का, असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. महापालिकेतील एका आढावा बैठकीत पालकमंत्री पतंगराव कदम व प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगली विधानसभेसाठी मदनभाऊंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. इच्छुकांमधील एक शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी आढावा बैठकीच्या दुसऱ्यादिवशीच जाहीर प्रसिद्धीपत्रक काढून अशा थेट नाव निश्चितीला विरोध केला. कॉँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची एक प्रक्रिया ठरलेली आहे. त्यानुसारच उमेदवार निवडला जाईल, असे स्पष्ट करून त्यांनी स्वत:लाही दिलासा दिला. वसंतदादा घराण्याविरोधात विरोधाचा सूर लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू झाला आहे. प्रतीक पाटील यांच्याविरोधात सुभाष खोत, माजी आमदार हाफिज धत्तुरे, दिगंबर जाधव यांनी उघड टीका केली होती. धत्तुरेंच्या बंडखोरीने लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांची डोकेदुखी वाढविली होती. विधानसभा निवडणुकीत आता सांगली मतदारसंघात पुन्हा बंडखोरीचे संकेत मिळत आहेत. इच्छुकांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय हालचाली सध्या थंड असल्या तरी मदन पाटील यांना उमेदवारी देण्याच्या नेत्यांच्या वक्तव्याने अंतर्गत पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. कुरणे यांनी गेल्या अनेक वर्षात कॉँग्रेसच्या अशा थेट नाव निश्चितीवर आक्षेप नोंदविला नाही. यंदा मात्र त्यांनी या गोष्टीला थेट विरोध केला. कॉँग्रेसचेच दिगंबर जाधव गेली महिनाभर मदन पाटील व कॉँग्रेसच्या कारभारावर टीका करीत आहेत. पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेकांनी स्थानिक पातळीवरील कारभारावर नाराजी व्यक्त केली. प्रस्थापितांनाच उमेदवारी देण्याच्या पद्धतीवरही टीका करण्यात आली. पक्षाच्या बैठकीत झालेली गरमागरमी विधानसभा निवडणूक काळातही सुरू राहण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसच्या बैठकांना केवळ पंचवीसभर कार्यकर्त्यांची हजेरी लागत असल्याने नाराजीची तीव्रता दिसून येत आहे. शहराध्यक्ष कुरणे यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केल्यामुळे नगरसेवकांनी त्यांनी बोलावलेल्या बैठकांना उपस्थित न राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे नाराजीची हीच परिस्थिती राहिली, तर विधानसभेच्या निवडणुकीत अनेक अडचणी कॉँग्रेससमोर निर्माण होणार आहेत.