शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
2
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
5
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
6
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
7
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
8
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
9
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
10
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
11
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
12
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
13
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
14
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
15
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
16
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
17
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
18
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
19
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
20
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

उमराह यात्रेच्या आमिषाने १८० भाविकांना ४५ लाखांचा गंडा-: सांगली, कोल्हापूर, पुण्यातील भाविकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:48 IST

सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस

ठळक मुद्दे दोघांवर गुन्हा

सांगली : सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविकांना सुमारे ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी भिवंडी (जि. ठाणे) येथील सख्ख्या भावांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमजान खान व मुस्ताक खान (रा. जवार हॉटेलजवळ, भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. खान यांची ‘रमजान’ टुरिस्ट नावाने कंपनी आहे. या कंपनीमार्फत सौदी अरेबियातील उमराह यात्रा घडवून आणण्याचे त्यांनी आमिष दाखविले. यासाठी त्यांनी सांगलीत दिलावर सिकंदर शेख (रा. बुधगाव, ता. मिरज) व कोल्हापूर जिल्ह्यात शादाब बडेखान नदाफ (इचलकरंजी) यांना भाविक जमा करण्यासाठी एजन्सी दिली होती. शेख व नदाफ भाविकांशी संपर्क साधून यात्रेला जाण्याचे आवाहन केले. पंधरा दिवसांतून ही यात्रा असते. खान यांनी जानेवारी २०१९ मध्ये यात्रेला जाण्यासाठी सौैदी अरेबिया या देशाचा व्हिसा व मुंबई ते सौदी अरेबिया विमान प्रवासाचे तिकीट देण्याचे आमिष दाखविले होते.

दिलावर शेख व शादाब नदाफ यांनी ५ फेब्रुवारी २०१८ पासून भाविकांशी संपर्क साधून यात्रेसाठी पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती. डिसेंबरअखेर त्यांनी सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यातील १८० भाविक जमा केले. त्यांच्याकडून प्रत्येकी २६ हजारापासून ते ३८ हजारपर्यंत रक्कम जमा करून घेतली. सुमारे ४५ लाख आठ हजार रुपयांची रक्कम त्यांनी गोळा केली होती. ही सर्व रक्कम त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेच्या सांगलीतील आझाद चौक शाखेत मुस्ताक खान याच्या खात्यावर जमा केली होती. १७ जानेवारी २०१९ पर्यंत जशी रक्कम गोळा होईल, त्याप्रमाणे शेख व नदाफ यांनी खानच्या खात्यावर जमा केले होते.जानेवारीची ३१ तारीख आली तरी खान बंधूंनी भाविकांना यात्रेला नेण्यासाठी काहीच हालचाली केल्या नाहीत. शेख व नदाफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पण ते टाळाटाळ करू लागले. गेल्या चार दिवसांपासून शेख हे खान यांच्या मोबाईलवर संपर्क साधत होते. पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच शेख यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांच्याकडे तक्रार केली. शर्मा यांनी सांगली शहर पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी रमजान खान व समशेर खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.बँक खाते गोठविण्यासाठी पत्रसंशयित रमजान व समशेर खान यांचे अ‍ॅक्सिस बँकेतील खाते गोठविण्यात यावे, असे पत्र पोलिसांनी बँक व्यवस्थापनास दिले आहे. खान यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोमवारी रात्री भिवंडीला रवाना झाले आहे. तेथील पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले जाणार आहे. राज्यातील आणखी काही जिल्ह्यातील भाविकांना खान यांनी गंडा घातला असण्याची शक्यता आहे. पोलीस उपनिरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी