बेवनूर येथे डी. बी. एल. कंपनीतर्फे उत्खनन सुरु आहे. यामुळे बोअर ब्लास्टमुळे वस्तीत येणाऱ्या दगडाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेले नुकसान व नंतर लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत म्हणून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांकडून लेखी हमी प्रमाणपत्र मिळावे, ग. नं. २५१ मधील उत्खनन क्षेत्र शेजारी सेफ झोन सोडला नसल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व सेफ झोन ज्ञापन जमीन खरेदी करुन घेणे व नुकसान टाळावे, २५००० हजार ब्रास उत्खनन परवाना खनिकर्म कडून असताना कंपनीने जास्त उत्खनन केल्याचे दिसून येते. त्याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यामार्फत पंचनामा करुन कारवाई व्हावी. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
उपोषणास नाथा पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्रेयस नाईक, दीपक पाटणकर, इर्शाद तांबोळी, संदीप नाईक, बापूसो टेंगले, संदीप शिंदे, तानाजी शिंदे, ओंकार शिंदे, प्रमोद काटे, माणिक वाघमोडे, आप्पासाहेब खांडेकर, बबलू खांडेकर उपस्थित होते.
200921\img20210920120221.jpg
महामार्गाचे काम करणाऱ्या डी.बी. एल कंपनीविरोधात जतमध्ये उपोषण