सांगली : शहरातील राम मंदिर चौक परिसरात असलेल्या इंद्रनील प्लाझा परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. याप्रकरणी प्रसन्नजीत अशोक कुदळे (रा. कुदळे प्लॉट, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.
--
अंजनीमध्ये एकजण जखमी
सांगली : अंजनी (ता. तासगाव) येथे एकजण दुचाकीच्या धडकेत जखमी झाला. नितीन जोतीराम पाटील (वय ३६) असे जखमीचे नाव असून, बुधवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---
टाकळीचा तरूण मारहाणीत जखमी
सांगली : टाकळी (ता. मिरज) येथील तरूण मारहाणीत जखमी झाला आहे. राहुल राजन पवार (वय २०) असे जखमीचे नाव असून, गुरूवारी दुपारी हा प्रकार घडला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--