शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-मिरजेत बनावट सिगारेटचा धूर दोघा दुकानदारांना अटक : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 21:59 IST

बिरमा गिडवाणी यांचे गणपती पेठेत गजानन स्टोअर्स नावाने दुकान आहे. या दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना मिळाली.

घनशाम नवाथे

सांगली : सांगली आणि मिरजेत नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटचा साठा करून विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसह छापे मारून १ लाख ६० हजाराचा सिगारेट साठा जप्त केला. याप्रकरणी बिरमा करमचंद गिडवाणी (वय ५०, रा. क्रांती हॉस्पिटलमागे, सांगली) व मुजाहिद मेहबूब चौधरी (वय ३८, रा. पटेल एम्पायर, रेवणी गल्ली, मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

बिरमा गिडवाणी यांचे गणपती पेठेत गजानन स्टोअर्स नावाने दुकान आहे. या दुकानात नामांकित कंपनीच्या बनावट सिगारेटचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी यशवंत गोसावी व श्रीकांत साखरे यांना मिळाली. गोसावी व साखरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला. यावेळी सिगारेटचा साठा आढळला. सिगारेटची पाकिटे ही कंपनीचे मूळ उत्पादन नसून बनावट असल्याचे निदर्शनास आले. उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने सिगारेटचा साठा पंचनामा करून जप्त केला. याप्रकरणी यशवंत गोसावी यांनी गिडवाणीविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

दरम्यान, मिरजेतील सराफ कट्टा येथे मुजाहिद चौधरी याच्या चौधरी ट्रेडर्स या दुकानात देखील नामांकित कंपनीची बनावट सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी अमोल बहुलेकर यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार यांच्या मदतीने दुकानात छापा टाकला. याठिकाणी देखील बनावट सिगारेटचा साठा आढळला. सिगारेटची पाकिटे कंपनीची अधिकृत नसून पाकिटावरील युनिक आयडी एकच असून तो देखील ‘फेक’ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिगारेटचा साठा जप्त केला. कंपनीचे अधिकारी बहुलेकर यांनी चौधरीविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सांगली व मिरजेतील छाप्यात नामांकित कंपनीचे ८०३ नग जप्त करण्यात आले. त्याची किंमत १ लाख ६० हजार ३१० रूपये इतकी आहे.गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बाबासाहेब माने, बसवराज शिरगुप्पी, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, अतुल माने, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, ऋतुराज होळकर, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने कारवाई केली.

कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा

बिरमा गिडवाणीविरूद्ध बीएनएस ३४६, ३४७ (१), व्यापार चिन्ह अधिनियम आणि कॉपीराईट ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर चौधरीविरूद्ध देखील कॉपीराईट ॲक्ट १९५७ च्या कलम ५१, ५१ (बी), ६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.