शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगावचे दोघेजण अपघातात ठार

By admin | Updated: April 16, 2017 23:48 IST

दाम्पत्य जखमी; प्रकृती चिंताजनक; नांद्रेजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

सांगली : दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाल्याने निमशिरसगाव (ता. कडेगाव) येथील दोघेजण ठार झाले. किसनराव ज्ञानू मांडके (वय ७०) व बाळासाहेब बाजीराव मांडके (४८) अशी त्यांची नावे आहेत. नांद्रे (ता. मिरज) येथे घुमट मळ्याजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.तसेच या अपघातात सांगलीतील विजयनगर येथे रेल्वे पुलाजवळ राहणारे जालिंदर गणपती साळुंखे (६०) व त्यांच्या पत्नी नलिनी (५०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, पण प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मिरजेतील खासगी रुग्णालयात हलविले आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी ही वाहने जप्त केली आहेत. नातेवाईक आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी साळुंखे दाम्पत्य रविवारी सकाळी दुचाकी (क्र. एमएच १०, एएस ३२३)वरून चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथे निघाले होते. याचवेळी किसनराव व बाळासाहेब मांडके हे दुचाकी (क्र. एमएच १०, एक्स ४७७५) वरून किसनराव मांडके यांचे सांगलीतील जावई काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी सांगलीत येत होते. ते नांद्रेतील घुमट मळ्याजवळ आले असता, या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये किसनराव व बाळासाहेब मांडके रस्त्यावर उडून पडले. साळुंखे दाम्पत्यही रस्त्यावर पडले. यामध्ये किसनराव जागीच ठार झाले, तर अन्य तिघांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले. (प्रतिनिधी)चुलता, पुतण्याच्या अपघाती मृत्यूने शिरसगाववर शोककळाकडेगाव : शिरसगाव येथील माजी सरपंच किसनराव ज्ञानू मांडके व त्यांचा पुतण्या बाळासाहेब बाजीराव मांडके या दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली.सांगलीत आजारी असलेल्या पाहुण्यांना पाहण्यासाठी निघालेले चुलता-पुतण्या परत आलेच नाहीत. आली ती त्यांच्या मृत्यूची बातमी. सांगलीला जातानाच नांद्रे, वसगडेजवळ अपघात झाला आणि या दोघांचाही यामध्ये मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूने शिरसगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. किसनराव मांडके हे माजी सरपंच होते. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा सख्खा पुतण्या बाळासाहेब मांडके हे सह्णाद्री साखर कारखान्यात नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. दोघांच्याही मृतदेहांवर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन बुधवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शिरसगाव येथे होणार आहे.