याबाबत सुजित दीपक साजणे (वय २०) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुजित साजणे हा कुटुंबासह दूधगाव-आष्टा रस्त्यावरील वाडकरवस्तीजवळ शेतात राहतो. मंगळवारी शेतात मळणीचे काम सुरू होते. या वेळी चोरट्याने त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीचे दाराचा कडीकोयंडा उचकडून घऱात प्रवेश केला. लोखंडी तिजोरीतील सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याची चेन, सुटी फुले व अंगठी, चांदीचे पैंजण व रोख दहा हजार असा एक लाख ५ हजाराचा ऐवज लंपास केला.
त्यानंतर चोरट्याने बागणी रस्त्यावरील अरुण विद्याधर कुदळे यांच्या घरावरही डल्ला मारला. कुदळे हे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वाडकर वस्तीवर गेले होते. त्यांनी घराला कडी घातली होती. चोरट्याने घरात शिरून तिजोरीच्या लाॅकर किल्लीने उघडून त्यातील सोन्याची चेन व साडेतीन हजार रुपये रोख असा ३१ हजाराचा मुद्देमाल लांबविला.