शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 14:39 IST

दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देआटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू, 646 जनावरे दाखल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

सांगली : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील आटपाडी मंडळातील तडवळे व दिघंची मंडळात आवळाई येथे या चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, दोन्ही चारा छावण्यात एकूण 646 जनावरे दाखल झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या जिल्ह्यात पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोन ठिकाणी चारा छावणी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्या

नुसार आटपाडी तालुक्यात दोन चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दि. 29 एप्रिल 2019 रोजी तडवळे येथे सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीत 392 मोठी आणि 80 लहान जनावरे अशी एकूण 472 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.  गजानन कामगार मजूर सहकारी सोसायटी लि. आटपाडी या संस्थेने ही चारा छावणी सुरू केली आहे. तर दि. 30 एप्रिल 2019 रोजी आवळाई येथे सिद्धनाथ महिला दुग्ध व्यावसायिक संस्था, आवळाई येथे दुसरी चारा छावणी सुरू करण्यात आली असून, या चारा छावणीत 131 मोठी आणि 43 लहान जनावरे अशी एकूण 174 जनावरे दाखल करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 15 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 6 किलोग्रॅम किंवा मुरघास 8 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य 1 किलोग्रॅम देण्यात यावे.

छावणीत दाखल झालेल्या प्रति लहान जनावरास हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस प्रतिदिन 7.5 किलोग्रॅम किंवा वाळलेला, प्रक्रियायुक्त वाळलेला चारा 3 किलोग्रॅम किंवा मुरघास 4 किलोग्रॅम आणि आठवड्यातून तीन दिवस एकदिवसआड पशुखाद्य अर्धा किलोग्रॅम देण्यात यावे. जनावरास चाऱ्याऐवजी ऊस द्यावयाचा झाल्यास तो अखंड न देता लहान तुकडे करून देण्यात यावा. यासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 90 रूपये आणि लहान जनावरांना प्रतिदिन प्रति जनावर 45 रूपये अनुदान अनुज्ञेय असणार आहे. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर