शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘महांकाली’च्या मालमत्तेवरही दोन बँकांचा दावा; थकीत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:28 IST

अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे.

ठळक मुद्देबँक आॅफ इंडियाकडून ताबा नोटीस प्रसिद्ध

सांगली : थकीत कर्जापोटी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने डिसेंबरमध्ये कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला असताना, बँक आॅफ इंडियानेही ४८ कोटीच्या थकबाकीपोटी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महांकाली कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी दोन्ही बँका आमने-सामने आल्या आहेत.

बँक आॅफ इंडियाच्या कवठेमहांकाळ शाखेमार्फत ‘महांकाली’ला कर्जपुरवठा करण्यात आला होता. कारखान्याकडे सध्या ४८ कोटी ७३ लाख ६५ हजार ५२४ रुपये थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बँकेने कारखान्यास १२ एप्रिल २0१९ रोजी सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत नोटीस बजावली होती. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने बँक आॅफ इंडियाने १६ जानेवारी २0२0 रोजी कारखान्याच्या मालमत्तांचा ताबा घेतल्याची नोटीस गुरुवारी प्रसिद्ध केली. या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये, असे बँकेने म्हटले आहे.

दुसरीकडे महांकाली साखर कारखान्याला जिल्हा बॅँकेने १३८ कोटी ५३ लाख ९५ हजार रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी २८ आॅगस्ट २०१९ रोजी मागणी नोटीस बजावली होती. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसह संचालक अनिता विजय सगरे, दीपक ओलेकर, आदगोंडा पाटील, किसन पोटोळे, आप्पासाहेब कोळेकर, हणमंत शिंदे, संभाजी पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष पाटील, शिवाजी कोळेकर, कोंडीबा हारगे, जीवन भोसले, बाळासाहेब ओलेकर, गणपती सगरे, रामचंद्र जगताप, पद्मिनी कुणूरे, शशिकला पाटील, रूद्रगोंडा पाटील, तानाजी भोसले यांना बॅँकेने नोटीस बजावून, ६० दिवसात थकबाकी भरण्यास सांगितले होते. पण मुदतीत त्यांनी थकबाकी न भरल्याने कारखान्यासह स्थावर व जंगम मालमत्तेचा जिल्हा बँकेने सोमवारी प्रतिकात्मक ताबा घेतला.

अन्य कोणत्याही बॅँका व वित्तीय संस्थांनी महांकाली कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा व्यवहार करू नये, केल्यास त्यांच्यावर जिल्हा बॅँकेचे थकीत कर्ज फेडण्याची जबाबदारी राहील, अशी नोटीस प्राधिकृत अधिकारी एम. बी. पाटील यांनी दिली आहे.

  • दोन कारखान्यांची स्थिती सारखीच

यापूर्वी आटपाडीच्या माणगंगा कारखान्याच्या थकीत कर्जवसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता याच दोन्ही बँकांनी ताब्यात घेतली आहे. त्याठिकाणीही संघर्ष सुरू आहे. काही दिवसातच दोन्ही बँकांनी महांकाली कारखान्याचा ताबा घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या मालमत्तेसाठीही पुन्हा दोन्ही बँकांत रस्सीखेच सुरू झाली आहे. यातून आता कर्जवसुलीसाठी कोणता मार्ग निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :bankबँकMONEYपैसा