तासगावमध्ये दोघे तरुण पिस्तूल विक्रीस येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार महिला तंत्रनिकेतन जवळील रस्त्यावर ते पाळत ठेवून होते. यावेळी जवळच असणाऱ्या एसटी पिकअप शेडजवळ दोन तरुण संशयितरीत्या फिरत असताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेतले असता रवींद्रनाथ जाधव याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल व त्याचे पॅन्टचे खिशात तीन जिवंत काडतुसे व राजकुमार पाटोळे याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तूल असा एकूण ८० हजार ९०० रुपयाचे दोन पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे, अमित परीट, सागर लवटे, सोमनाथ गुंडे, विलास मोहिते, समीर आवळे, सतीश खोत, विनोद सकटे, दत्तात्रय जाधव, प्रशांत सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.