शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस गर्भलिंग निदानास आणणारे दोन एजंट ताब्यात - सांगलीत ‘वेध’ रुग्णालयात घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:03 IST

येथील मुख्य बसस्थानकाजवळील वेध डायग्नोस्टिक सेंटर या हॉस्पिटलमध्ये आलास (ता. शिरोळ) येथे गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यास आणणाऱ्या दोन एजंटांचा डॉ.

सांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील वेध डायग्नोस्टिक सेंटर या हॉस्पिटलमध्ये आलास (ता. शिरोळ) येथे गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यास आणणाऱ्या दोन एजंटांचा डॉ. जयश्री पाटील व डॉ. श्रेणिक पाटील यांनी शनिवारी भांडाफोड केला.

महिलेसह दोन एजंटांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पोलिसांची मदत घेऊन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जाणार असल्याचे पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय कवठेकर यांनी सांगितले.बानू शेख (रा. सांगली) व जब्बार सनदी (ब्रम्हनाळ, ता. पलूस) अशी ताब्यात घेतलेल्या एजंटांची नावे आहेत. हे दोघेही सिव्हिल चौकातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहेत. त्यांनी आलास येथील गर्भवती महिलेस गर्भलिंग निदान करण्यासाठी गळ घातली. ही महिलाही तयार झाली. यासाठी त्यांनी महिलेकडून २० हजार रुपये घेतले. शनिवारी दुपारी बारा वाजता ते वेध डायग्नोस्टिक सेंटरमध्ये नेले. संशयितांनी डॉ. श्रेणिक पाटील यांची भेट घेऊन महिलेची ‘तुम्हीच सोनोग्राफी तपासणी करा’, असा आग्रह धरला. त्यांना संशय आला. त्यांनी त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्याही तातडीने रुग्णालयात आल्या. त्यांनी संबंधित महिलेस विश्वासात घेऊन चौकशी केली. या महिलेने ‘मला बानू शेख व जब्बार सनदी यांनी गर्भलिंग निदान करण्यासाठी येथे आणले आहे, यासाठी त्यांनी २० हजार रुपये घेतले आहेत, असे सांगितले.डॉ. जयश्री पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शहरचे पोलीस निरीक्षक मिलींद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर दाखल झाले. डॉ. कवठेकर यांनी गर्भलिंग निदानास आणलेल्या महिलेची चौकशी केली. तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर बानू शेख व जब्बार सनदी यांना पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.ओळखीतून हमीसंशयित शेख व सनदी सिव्हिल चौकातील ज्या रुग्णालयात नोकरी करतात, तिथे आलासमधील या महिलेचे नातेवाईक उपचारासाठी काही दिवसांपूर्वी दाखल होते. ही महिला त्यांना पाहण्यास गेली होती. त्यावेळी शेख व सनदी यांच्याशी ओळख झाली. यातून त्यांनी महिलेस गर्भलिंग निदान करुन देण्याची हमी दिली होती. यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली. महिलेचा साडी विक्रीचा व्यवसाय आहे. साड्या विकून तिने पैशाची जुळणी करुन संशयितांना दिले होते. 

गर्भलिंग निदान व गर्भपात प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. संशयितांसह डॉ. जयश्री पाटील, डॉ. श्रेणिक पाटील यांचे जबाब घेतले जातील.- डॉ. संजय कवठेकर, आरोग्य अधिकारी, महापालिका, सांगली.

टॅग्स :Abortionगर्भपातhospitalहॉस्पिटल