शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पंचवीस हजारात दुचाकी देण्याची नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:04 IST

चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो,

ठळक मुद्देसाखळी योजना : फसवणुकीची शक्यता

अशोक पाटील ।इस्लामपूर : चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो, अशी नामी शक्कल लढवली आहे. या योजनेकडे बरेच ग्राहक आकर्षित झाले आहेत. ही योजना साखळी पध्दतीने असून यामध्ये फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.विविध फायनान्स कंपन्यांकडून, एक रुपया भरा आणि चारचाकी गाडी घेऊन जा, अशाही योजना राबविल्या जात आहेत. याकडेही ग्राहक चांगलाच आकर्षित होत आहे.

अशाच पध्दतीने स्टार नामक कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि कोणत्याही कंपनीची दुचाकी घेऊन जा, पुढील हप्ते आम्ही भरू, त्यापोटी २५ हजार रुपये भरून गाडी नेणारे तीन ग्राहक मिळवून द्यावयाचे आहेत. हे जमले नाही, तर व्याजासहीत पूर्ण गाडीची रक्कम वसूल केली जाईल, अशी योजना जाहीर केली आहे.या योजनेकडे ग्राहक आकर्षित झाला आहे. सध्या वाहनांच्या बाजारात नवीन आणि जुन्या गाड्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अशा गाड्या घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. यासाठीही फायनान्स कंपन्यांबरोबरच दुचाकी वाहनांच्या कंपन्यांनीही, विक्री वाढावी यासाठी विविध योजनांतून जाहिरातबाजी सुरू केली आहे.

सुरुवातीच्या काळात नामवंत कंपन्यांच्या दुचाकी घेणेही मुश्किल होते. दोन ते तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गाडी ताब्यात मिळत होती. पण सध्याची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. प्रत्येक घरात किमान दोन दुचाकी आहेत. दिवसेंदिवस दुचाकी विक्रीवर मोठा परिणाम दिसत आहे. त्यामुळेच काही खासगी फायनान्स कंपन्यांनी विविध योजना राबवून बाजार मांडला आहे. २५ हजार रुपये भरुन तीन ग्राहक आणण्याची योजना यापैकीच आहे. त्याला अनेकजण बळी पडत आहेत. दुचाकी निर्मिती करणाºया कंपन्यांचा आणि या योजनेचा काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfraudधोकेबाजी