शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.६३ टक्के;उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:15 IST

बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत फारशी गर्दी केलीच नाही.

ठळक मुद्दे सांगली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.६३ टक्के;उत्तीर्णांमध्ये मुलींचीच बाजी गतवर्षीच्या तुलनेत ५.०८ टक्क्याने वाढ; निकालाची प्रत मिळविण्यासाठी नेट कॅफेमध्ये गर्दी

सांगली : बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅनलाईन निकाल नेट कॅफेमध्ये व मोबाईलवरून पाहिला. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत फारशी गर्दी केलीच नाही. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी बारावीचा निकाल आॅनलाईन जाहीर केला. बारावी परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक शाखेतील ३४ हजार २६८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत ९१.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागीलवर्षी सांगली जिल्ह्याचा निकाल ८६.५५ टक्के लागला होता. यावर्षी निकालामध्ये ५.०८ टक्के वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बारावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. यंदाही पुन्हा मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९५.९९ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात विज्ञान विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.०३ टक्के, तर सर्वात कमी कला शाखेचा ८१.३५ टक्के लागला. वाणिज्य विभागाचा ९४.६७ टक्के निकाल लागला आहे. किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ९०.२९ टक्के निकालाची नोंद झाली.शाखानिहाय निकाल...शाखा                 उत्तीर्ण विद्यार्थी     टक्केवारी

  • विज्ञान                             १४९५७     ९८.०३
  • कला                                   ९०३३      ८१.३५
  • वाणिज्य                             ५८३८     ९४.६७
  • व्यावसायिक                        १५७१     ९०.२९

पुनर्परीक्षार्थींचा निकाल ३४.८१ टक्केजिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी म्हणून एक हजार ६९५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ३४.८१ टक्के इतकी आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालSangliसांगली