शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कारंदवाडी येथील तुषार कणसे यांची अवयव दान मोहीम समाजासाठी ठरतेय प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:40 IST

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे.

ठळक मुद्दे४० जणांचा प्रतिसाद : अनेक रुग्णांचे जीव वाचण्यास मदत होणार

आष्टा : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील डॉ. तुषार कणसे यांनी अवयव दान मोहीम प्रभावीपणे राबवून युवा पिढीला प्रेरणा देणारे काम केले आहे. आजअखेर सुमारे ४० अवयव दात्यांना अवयव दानाचे महत्त्व पटवून देण्यात ते यशस्वी ठरले असून, या मोहिमेत सर्वांनी सहकार्य केल्यास भविष्यात अनेक रुग्णांचा जीव वाचणार आहे.

कारंदवाडी हे आष्टा-सांगली रस्त्यावरील एक छोटे खेडेगाव. वडील राजाराम कणसे या सुसंस्कृत शिक्षकाच्या संस्कारांमुळे लहानपणापासून डॉ. कणसे गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर मोठ्या शहरात व्यवसाय न करता गावातील रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

आष्टा, कारंदवाडी, तुंग येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेकदा आरोग्य शिबिरांचे आयोजन केले. त्यांना राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे राज्य सरचिटणीस पद मिळाले. आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे घेतली. या शिबिरातूनच त्यांना अवयवदान विषयावर काम करण्याची प्रेरणा मिळाली. एखाद्या रुग्णाचे अवयव निकामी झाल्यास त्याला दुसरा अवयवदाता मिळाला, तरच त्याचे जीवन सुसह्य होते अन्यथा मृत्यू अटळ ठरतो.

वेळेत अवयव दाते उपलब्ध न झाल्याने आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबद्दल समाजात जनजागृती करून लोकांना अवयव दानासाठी प्रेरित करण्याची मोहीम कणसे यांनी हाती घेतली. वाळवा, तासगाव, शिराळा, मिरज यासह जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले. प्रारंभी लोकांना पटले नाही, मात्र त्यांनी प्रयत्न सुरुच ठेवले. हळूहळू लोकांना आपल्या अवयवांची मृत्यूनंतर राख होण्यापेक्षा, त्यांची कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होईल, ही जाणीव होत आहे. यातूनच आजअखेर सुमारे चाळीस अवयव दात्यांनी उपक्रमास प्रतिसाद दिला.शरद पवारांकडून कौतुकहजारो अवयवदाते तयार झाले, तर अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतील, असा विश्वास डॉ. कणसे यांनी व्यक्त केला. डॉ. कणसे यांच्या कार्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही कौतुक केले. त्यांचा हा समाजोपयोगी उपक्रम आदर्शवत ठरला आहे.