फाेटाे : २२ सुनील पाटील
लाेकमत न्यूज नेटवर्क
बाेरगाव : तुपारी (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा झनक राक्षे यांची, तर उपसरपंचपदी सुनील पाेपट पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून आर. डी. महाडिक यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणीत पॅनल सत्तेवर आले आहे. नवीन सदस्यांच्या बैठकीत सरपंच व उपसरपंच निवड करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसभापती संजय पाटील, माजी सरपंच दीपक पाटील, प्रकाश पाटील, पतंगराव पाटील, राजाराम पाटील, भानुदास पाटील, माणिक पाटील, बाबूराव पाटील, नितीन पाटील, मधुकर पाटील, बजरंग माने, राजाराम मरळे, भास्कर पाटील, सुकुमार पाटील, ब्रम्हा नलवडे, विष्णू नलवडे, महेश नलवडे, जगन्नाथ नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडीनंतर नूतन सरपंच-उपसरपंचांची ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.