शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीस हजारावर जनावरांची हेळसांड

By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST

दरीबडचीतील प्रकार : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांविना २७ लाखांचा ‘सुसज्ज’ दवाखाना

दरीबडची : दरीबडची (ता. जत) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून अधिकाऱ्यांविना सुरू आहे. कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने २० हजार ३२९ जनावरांची हेळसांड सुरू आहे. लाळखुरकत, बुळकांडी, गोचिडताप, आंत्रविषार, गर्भतपासणी, जंतनिर्मूलन कार्यक्रम, कृत्रिम रेतन, गर्भ व वांझ तपासणी आदी रोगांची लस मोहीम शिबिरे होत नाहीत. कागदोपत्री शिबिरे उरकली जात आहेत. लाळखुरकत, आंत्रविषार आजारांनी १७ जनावरे दगावली आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. २७ लाख रुपये खर्चून उभारलेला सुसज्ज दवाखाना बंदच असल्याने शासनाचे पैसे वाया गेले आहेत. पूर्व भागातील दरीबडची, पशुवैद्यकीय दवाखाना वर्ग-१ अंतर्गत दरीबडची, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, लमाणतांडा, पांढरेवाडी, दरीकोणूर, तिल्याळ या गावांचा समावेश आहे. खिलार जनावरांसाठी हा परिसर प्रसिध्द आहे. गाय, बैल, म्हैस, शेळ््या-मेंढ्यांची संख्या मोठी आहे. माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची पैदासही केली जाते.दुग्धोत्पादन व्यवसायाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे. वारणा, राजारामबापू व खासगी संघांकडून दूधसंकलन केले जाते. जर्सी गाय, म्हैस यांची संख्या मोठी आहे. दवाखान्याचा हंगामी कार्यभार तिकोंडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डोळ्ळी यांच्याकडे आहे. दुसरीकडील कार्यभार असल्याने ते येथे येत नाहीत. डॉक्टरांअभावी दवाखाना बंद असतो. ,पशुसंवर्धन विभागाकडून दवाखान्याची गोचीड निर्मूलन औषध, रेबीज लस, कॅल्शियम, अँटीबायोटिक, ‘अ’ जीवनसत्त्व कमतरतेची औषधे, सलाईन, जंत निर्मूलन औषधे आदी औषधे येतात; परंतु डॉक्टर नसल्याने ती तालुक्यामधून उचललीच जात नाहीत. महत्त्वाची औषधे येत नाहीत. कोणत्याच रोगावर इलाज केला जात नाही. त्यामुळे दवाखान्याची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. शेतकरी जनावरांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार करुन घेत आहेत. हे डॉक्टर भरमसाट फी घेऊन उपचार करीत आहेत. सध्या दरीबडची येथे लाळखुरकतची साथ सुरु आहे. बाळू गुगवाड यांच्या २, जोतिराम सावंत यांची १, तसेच मारुती सावंत यांच्या २ शेळ्या-मेंढ्या दगावल्या. डिसेंबरमध्ये शेळ्यांना आंत्रविषारची साथ आली होती. त्यामध्ये १२ शेळ्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर दरीबडची, जालिहाळ, तिल्याळ येथे शिबिर घेण्यात आले. बाकीच्या गावांमध्ये शिबिरेच झाली नाहीत. (वार्ताहर)सुसज्ज दवाखाना निंरूपयोगीगावाशेजारी जालिहाळ रस्त्यावर फॉरेस्टजवळ २७ लाख रुपये खर्चून सुसज्ज दवाखाना उभारण्यात आला आहे. डॉक्टर, कर्मचारी निवास, औषध भांडारगृह, दवाखाना खोली अशा इमारती बांधल्या आहेत. सभोवती कंपाऊंड आहे. वीजपुरवठा आहे. कूपनलिका खोदली आहे. परंतु येथे कोणीच वास्तव्य करीत नाही. येथे कायमस्वरुपी स्वतंत्र पशुवैद्यकीय डॉक्टरची नेमणूक करण्याबाबतची मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी पशुसंवर्धन विभाग व पंचायत समितीकडे केली आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एल. अघाव यांनी, दवाखान्याचा अधिभार डॉ. डोळ््ळी यांच्याकडे आहे. त्यांना उपस्थित राहण्यास सांगतो, असे थातुरमातुर उत्तर दिले.दवाखान्यात डॉक्टर नसल्याने जनावरांवर वेळेत उपचार होत नाहीत. लस मोहीम शिबिरे होत नाहीत. रोगाच्या साथीने जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांच्या जनावरांसमोर संकट उभे आहे. केवळ सुसज्ज दवाखाना बांधून उपयोग होत नाही, तेथे कायमस्वरुपी डॉक्टरची नेमणूकही करावी, अशी आमची मागणी आहे.- बाळू गुगवाड, शेतकरीजनावरांची संख्या गाई - बैल - ६ हजार ३४७म्हैशी - १ हजार ४१२शेळ्या-मेंढ्या - १२ हजार ५७0कोंबड्या - १0 हजार ६६२