शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

महाआरोग्य शिबिरातून आष्ट्यात रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2016 00:27 IST

पालिकेसाठी विरोधक एकवटले : आज राजू शेट्टी, प्रतीक पाटील यांची उपस्थिती

सुरेंद्र शिराळकर -- आष्टा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी माजी मंत्री आ. जयंत पाटील व माजी आमदार विलासराव शिंदे गटात धुसफूस सुरू असताना, आष्ट्यातील सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन स्थापन केलेल्या आष्टा शहर लोकशाही आघाडीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करीत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. याचे उद्घाटन खासदार राजू शेट्टी व माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्याहस्ते आज, रविवारी होत आहे. यानिमित्ताने सर्व विरोधक सत्तांतरासाठी एकवटल्याने वातावरण तापले आहे. आष्टा नगरपालिकेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ मध्ये झाली. पालिकेने गतवर्षी १६१ वा वर्धापन दिन साजरा केला. यातील प्रारंभीची काही वर्षे वगळता विलासराव शिंदे, दिवंगत राजारामबापू पाटील, आ. जयंत पाटील गटाची पालिकेवर सत्ता राहिली आहे. मागील अनेक वर्षे शिंदे गटाची एकहाती सत्ता आहे. २००६ ची पालिका निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी फक्त शिवसेनेच्या विनायक इंगवले यांना नगरसेवकपदाची संधी मिळाली. मात्र पालिकेत पाटील-शिंदे गटाव्यतिरिक्त कोणासही संधी मिळालेली नाही. २०११ ची पालिका निवडणूक प्रारंभी अटीतटीची होईल, असे चित्र असताना, मतदान दोन दिवस पुढे गेल्याने सत्ताधारी गटास फोडाफोडीस वेळ मिळाल्याने विरोधकांना एकही जागा मिळाली नाही. विरोधक वेगवेगळे लढल्याने त्याचा फायदा सत्ताधारी गटाला झाला. विरोधकांची एकूण टक्केवारी जास्त असूनही, सत्ताधारी गटास पुन्हा संधी मिळाली होती. राहुल थोटे, वीर कुदळे, अमोल पडळकर, लता पडळकर, गुंडाभाऊ आवटी यांचा विजय थोडक्यात हुकला होता. वेगवेगळे लढल्याने विजय हातातून निसटलेल्या विरोधकांनी धडा घेत यंदा एकत्र येण्याचा निश्चय केला व त्यांनी आष्टा शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे.कॉँग्रेसचे राहुल थोटे, माजी नगरसेवक अमोल पडळकर, अण्णासाहेब मालगावे, अशोक हिरुगडे, बाबासाहेब कुलकर्णी, शिवसेनेचे पोपट भानुसे, वीर कुदळे, हणमंत सूर्यवंशी, मनसेचे राजकुमार सावळवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुंडाभाऊ आवटी, भाजपचे डॉ. सतीश बापट, आरपीआयचे प्रदीप आवळे यांच्यासह दिलीप कुरणे, बी. एल. पाटील यांनी पालिकेचा किल्ला सर करण्यासाठी आघाडीची स्थापना केली आहे.सगळे विरोधक एकत्ररविवार, दि. ११ रोजी श्रीराम सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या महाआरोग्य शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्ररोग, कर्करोग, मूतखडा, कान नाक, हाडांची तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. श्रवणयंत्र वाटप होणार आहे. रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना एक लाखाचा मोफत विमा देण्यात येणार आहे. खासदार राजू शेट्टी, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल महाडिक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य अभिजित पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित राहणार असून, महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने विरोधक पालिकेचे रणशिंग फुंकत आहेत.