शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

अलकूडजवळ ट्रकची मोटारीस धडक; एक ठार

By admin | Updated: June 10, 2017 00:20 IST

अलकूडजवळ ट्रकची मोटारीस धडक; एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळ : चिंचणी (ता. अथणी) येथून देवदर्शनाहून परतत असताना, मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर अलकूड (एम) नजीक ट्रक आणि मोटारीच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले. दिगंबर महादेव वाघमोडे (वय ४३, रा. कुर्डुवाडी, ता. माढा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता घडला. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील रेल्वे कॉलनीतील वाघमोडे कुटुंबिय नवदाम्पत्यासह कर्नाटकातील चिंचणी येथे मायाक्का देवीच्या दर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता मोटारीतून सर्वजण चिंचणीसाठी रवाना झाले. पहाटे देवदर्शन घेऊन दुपारी ते मिरजमार्गे कुर्डुवाडीला परतत होते.दुपारी चार वाजता त्यांची मोटार (क्र. एमएच ४५ - ५८६०) मिरज-पंढरपूर रस्त्यावर अलकुड एम गावाजवळ असणाऱ्या उत्तम प्रेस्टीज या कारखान्याजवळ आली असता शिरढोणहून मिरजेच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच १० ए ९३८०) समोरच्या वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात वाघमोडे यांच्या मोटारीला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात दिगंबर वाघमोडे हे जागीच ठार झाले, तर अन्य दहाजण गंभीर जखमी झाले. ट्रक चालकाने पाईप कारखान्याकडे अचानक ट्रक वळविल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.अपघातात नवदाम्पत्य मुक्ता यशवंत वाघमोडे (वय २१) व यशवंत बजरंग वाघमोडे (वय २५) यांच्यासह सुनीता बजरंग वाघमोडे (वय ४५), महेश विष्णू देवकाते (वय २८), संतोष नवनाथ नरुटे (वय ३०), चंदना दिगंबर वाघमोडे (वय ११), अर्जुन दिगंबर वाघमोडे(वय १३), राही जानकर, हिरकणा प्रकाश एडके (वय ५५, सर्वजण रा. रेल्वे कॉलनी कुर्डुवाडी, ता. माढा) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ खासगी वाहनातून मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.