शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात फाळकूटदादांचा उच्छाद धाबे, हॉटेल व्यावसायिक, व्यापाºयांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:04 IST

अशोक पाटील ।इस्लामपूर : शहर आणि परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी यांना दम देणाºया फुकटचंबू फाळकूटदादांनी उच्छाद मांडला आहे. त्यांना पांढरपेशा गुंडांचा आधार मिळत आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.शहरात मोठ्या गुन्ह्यांचा आलेख कमी होत चालला असला तरी, चौका-चौकात फाळकूटदादांची टोळकी वाढू लागली ...

ठळक मुद्देपांढरपेशा बड्या गुंडांच्या नावाखाली पैशाची वसुली

अशोक पाटील ।इस्लामपूर : शहर आणि परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी यांना दम देणाºया फुकटचंबू फाळकूटदादांनी उच्छाद मांडला आहे. त्यांना पांढरपेशा गुंडांचा आधार मिळत आहे. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

शहरात मोठ्या गुन्ह्यांचा आलेख कमी होत चालला असला तरी, चौका-चौकात फाळकूटदादांची टोळकी वाढू लागली आहेत. हे फाळकूटदादा हॉटेल, ढाबा मालक आणि छोट्या व्यापाºयांना दमदाटी करून पैशांची मागणी करत आहेत; तर काहीजण मोबाईल दुकानदारांना दम देऊन मोबाईल उचलून नेतात. तसेच पैसे न देता बॅलन्स मारुन घेतात. याला एखाद्याने नकार दिल्यास मग मारहाण केली जाते. अशा गुंडांवर वचक ठेवण्यासाठी एका मोबाईल दुकानदाराने आपल्याकडेच दोन गुंड ठेवले आहेत. या सर्व प्रकाराबाबात पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे या दादांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

वाहतुकीची समस्या नेहमीचीच डोकेदुखी आहे. गुरुवारी आणि रविवारी आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. याचा फायदा चोरटे उचलतात. बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरीचे प्रमाणही वाढतच चालले आहे. या बाजारातही फाळकूटदादा हप्ते वसूल करताना दिसतात. बाहेरील छोट्या व्यापाºयांकडूनही पावतीपेक्षा जादा पैसे वसूल केले जातात.

बसस्थानकावरील चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणे, पर्स मारणे आदी घटना घडू लागल्या आहेत. यामध्ये या फाळकूटदादांचाच वरदहस्त आहे. येथे नेमणुकीसाठी असलेले पोलीस मात्र नेहमीच इतरत्र भटकताना दिसतात.

फाळकूटदादा : ‘स्पेशल मसुरा’इस्लामपूर परिसरातील धाब्यांवर ‘अख्खा मसूर’ ही डीश लोकप्रिय आहे. अनेक फाळकूटदादा फुकट अख्खा मसूर खाण्यासाठी चटावलेले आहेत. त्यामुळे एका ढाब्यावर चांगलीच शक्कल लढवली आहे. फाळकूटदादांची गँग आली की त्यांना इतरांपेक्षा ‘स्पेशल’ मसुरा दिला जातो. हा स्पेशल मसुरा म्हणजे इतर ग्राहकांच्या ताटातील उष्टा मसुरा असतो. ताटात शिल्लक राहिलेला हा मसुरा गोळा करून त्यांना दिला जातो. त्यावर हे दादा ताव मारताना दिसतात!