शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

गटांच्या सामर्थ्याची तिरंगी लढत

By admin | Updated: October 1, 2014 23:59 IST

चौघे अपक्ष रिंगणात : महाडिक, जयंत पाटील गटांची भूमिका निर्णायक

विकास शहा - शिराळा-विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख या तीन पारंपरिक गटांबरोबर निवडणूक रिंगणात नंदकिशोर नीलकंठ (शिवसेना), वैभव वाघमारे (बसपा) या पक्षीय उमेदवारांसह चार अपक्ष उमेदवारही आहेत. अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेऊन शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याच्या पवित्रा घेतल्याने रंगत आली आहे.या मतदारसंघातील राजकारण १९९५ पासून सतत बदलत आहे. दोन नाईक-देशमुख हे तीन प्रमुख गट प्रत्येकी वेगवेगळ्या भूमिकेतून पाठिंबा व्यक्त करीत होते. २००४ मध्ये तिन्ही गटांचे उमेदवार रिंगणात होते. यावेळीही हे तिन्ही गट एकमेकांसमोर आले आहेत. प्रत्येक निवडणुकीत माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, नानासाहेब महाडिक या गटांच्या भूमिका निर्णायक ठरल्या आहेत. त्यावेळी जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांनी शिवाजीराव नाईक यांना पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतला आहे. तिन्ही गटांचे नेते महाडिक गटाच्या संपर्कात होते. याबाबत महाडिक गट उद्या, दि. २ आॅक्टोबर रोजी अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहे. जयंत पाटील हे मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर असल्याने वाळवा तालुक्यातील मतदान त्यांना मिळेल, असा दावा त्यांच्या गटाकडून केला जात आहे.आमदार नाईक गेल्या पाच वर्षात ५१७ कोटींची विकासकामे, वाकुर्डे योजना कार्यान्वित, गिरजवडे प्रकल्प कामास सुरुवात, विविध प्रकल्पांची उभारणी या मुद्यांवर निवडणूक लढवीत आहेत. माजी आमदार शिवाजीराव नाईक वाकुर्डे योजना, विविध प्रकल्पांची उभारणी, पाच वर्षातील खुंटलेला विकास हे विषय घेऊन रिंगणात उतरले आहेत. तसेच सत्यजित देशमुख यांनी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केलेली विकासकामे, पक्षीय कामे, गेल्या पाच वर्षात आणलेला विकास निधी यावर भर दिला आहे.२००४ मध्ये दोन नाईक गटात फूट पडली, त्यामुळे मानसिंगराव नाईक पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख बंडखोरी करून रिंगणात होते. त्यामध्ये शिवाजीराव नाईक विजयी झाले होते. या निवडणुकीत तिन्ही गट एकमेकांविरुध्द लढले होते. २००९ मध्ये सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला होता. त्यामध्ये शिवाजीराव नाईक पराभूत झाले होते. आता यावेळी पुन्हा तीन गट एकमेकांसमोर आहेत. तसेच तिन्हीही उमेदवार यावेळी पक्षाच्या चिन्हावर लढत आहेत. आमदार नाईक, माजी आमदार नाईक यांनी सहा महिन्यांपासूनच प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर सत्यजित यांनी आघाडी झाली नाही तर आपल्याला उमेदवारी मिळेल या विचारात प्रचार धिम्या गतीने चालू ठेवला होता. आता त्यांनी प्रचारात वेग घेतला आहे. भाजप-शिवसेना वेगळी झाल्याने याचा फटका या युतीच्या उमेदवारांना बसणार आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या आघाडीच्या उमेदवारांनाही मतविभागणीचा फटका बसेल. तिन्ही उमेदवार गावेच्या गावे, वस्त्या न वस्त्या, वाड्या न वाड्या पिंजून काढत आहेत. कार्यकर्त्यांची पळवापळव, गेलेले कार्यकर्ते परत आणणे यासाठी प्रमुख नेत्यांची दमछाक होत आहे.शिवसेनेने नंदकिशोर नीलकंठ, बसपने वैभव वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना मिळणारी मते निर्णायक ठरतील. निवडणुकीत या मतदारसंघातील दोन नाईक-देशमुख या तीन गटांची ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ‘आर या पार’ याप्रमाणे तिन्ही नेते मैदानात आहेत.शिराळाएकूण मतदार २,७४,४२७ नावपक्षमानसिंगराव नाईक राष्ट्रवादीशिवाजीराव नाईकभाजपसत्यजित देशमुखकाँग्रेसनंदकिशोर नीलकंठ शिवसेनावैभव वाघमारेबसपाविश्वजित पवारअपक्षबबनराव परीटअपक्षमोहन ऐतवडेकरअपक्षसंजय जाधवअपक्ष