शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पळशीतील तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 21:23 IST

बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला.

सांगली, दि. 14 - बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरून झालेल्या खून खटल्याच्या सुनावणीस गुरुवारी जिल्हा न्यायालयात प्रारंभ झाला. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. ते सुनावणीला हजर राहिले. दोषारोपत्रात बदल करणार असल्याचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिल्याने पुढील सुनावणी १० आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यात तीन महिलांचा खून केल्याचा गुन्हा नोंद आहे. सुधीर घोरपडे याच्या बहीण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब ब्रम्हदेव शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटुंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीर घोरपडे याला होता. या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्र रवींद्र कदम व एक अल्पवयीन यांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशिगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्त करण्यात आहे. संशयितातर्फे सांगलीतील अ‍ॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गुरुवारी खून खटल्यास प्रारंभ झाला. अ‍ॅड. निकम उपस्थित होते. त्यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १८ आॅक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. भरदिवसा घरात घुसून झालेल्या या तिहेरी खून प्रकरणामुळे जिल्हा हादरला होता. विटा पोलिसांनी दोन दिवसात याचा छडा लाऊन संशयितांना अटक केली होती. गुलबर्ग्यातून चाकू खरेदीसंशयितांनी कर्नाटकातील गुलबर्गा येथे जाऊन खुनाचा कट रचला. ब्रम्हदेव शिंदे याच्या घरात कोणी सापडेल, त्याला संपवायचे, असा निर्णय घेतला होता. तेथील एका लॉजवर त्यांनी मुक्काम केला होता. तिथेच त्यांनी तीन चाकू खरेदी केले. पळतील शिंदे वस्तीवर पाणी मागण्याचा बहाणा करुन तिघांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तीन महिलांचा खून केला होता.