यावेळी लोकोपयोगी असे पिंपळ, जांभूळ या वृक्षाची रोपे लावण्यात आली. कऱ्हाड येथील प्रज्ञा एंटरप्रायजेसने एक लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या सहकार्याने हे वृक्षाराेपण करण्यात आले. या माेहिमेस सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन नगर पंचायत प्रशासनाने यावेळी दिले. कार्यक्रमास मुख्याधिकारी कपिल जगताप, नगराध्यक्षा संगीता राऊत, पोलीस निरीक्षक पी. बी. भोपळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मकरंद बर्वे, ज्ञानेश्वर शिंदे, हेमंत व्यास, प्रज्ञा एंटरप्रायजेसच्या राज्य समन्वयक उषा साळुंखे, सुचित्रा सोनावले, तालुका समन्वयक शुभांगी देशमुख, पूजा माळी उपास्थित होते.
फोटो : ०७ कडेगाव १
ओळ : कडेगाव नगर पंचायत परिसरात मुख्याधिकारी कपिल पाटील, नगराध्यक्षा संगीता राऊत, पोलीस निरीक्षक पी. बी. भोपळे. डाॅ. मकरंद बर्वे, ज्ञानेश्वर शिंदे. उषा साळुंखे, शुभांगी देशमुख यांच्या उपस्थितीत वृक्षाराेपण करण्यात आले.