शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!

By admin | Updated: March 1, 2017 23:58 IST

इस्लामपूर पालिका : सभागृहातील हजेरी पुस्तकाचे वादंग

इस्लामपूर : इस्लामपूर पालिकेतील कारभार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोर’ असाच म्हणावा लागेल. गेल्या ३१ वर्षात ‘एक कारभारी संसार भारी’ असा सुखी संसार होता. पण आता ‘एक अनाडी बाकी खिलाडी’ अशी अवस्था पालिका प्रशासनाची झाली आहे. विकास आघाडीने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर सभागृहात गदारोळ झाला. याचा चलचित्रपट इस्लामपूरकरांनी पाहिला. विकास आघाडीचा हा फक्त ट्रेलर आहे, पुढे सिनेमा बाकी आहे, हे जनतेला आता कळले आहे.माजी मंत्री, आमदार जयंत पाटील आणि पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता अबाधित होती. विरोधी गटातील विरोधी पक्षनेते विजय कुंभार सोडले, तर शिवसेनेचे आनंदराव पवार, महाडिक गटाचे कपिल ओसवाल हे वळवाच्या पावसाप्रमाणे पालिकेत हजेरी लावत होते. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीचा सभागृहात ‘हम करेसो कायदा’ होता. राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांना बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. त्यातूनही बी. ए. पाटील, संजय कोरे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते विरोध करताना दिसत होते. त्यांचा आवाज दाबण्याची कला मात्र विजयभाऊ पाटील आणि अ‍ॅड. चिमण डांगे यांच्याकडे होती.आता नवीन सभागृहात मात्र महिला सदस्यांसह सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पालिकेतील सर्वच बेकायदेशीर काळी कृत्ये चव्हाट्यावर येणार आहेत. विकास आघाडीतून जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष निशिकांत पाटील शैक्षणिक संकुलातून अचानक पालिकेच्या राजकारणात आले. त्यामुळे ते आजही अनाडीच आहेत. त्यांच्याबरोबर असणारे विक्रमभाऊ पाटील, वैभव पवार खिलाडी आहेत. या खिलाडींना आवरण्यासाठी निशिकांत पाटील यांनी माजी नगरसेवक भास्कर कदमसारखा तगडा रनर पालिकेच्या प्रशासनात ठेवला आहे. विक्रमभाऊ पाटील आणि भास्कर कदम यांच्यातही वाद झाल्याची चर्चा आहे. सभागृहात पीठासन अधिकारी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची ताकद वगळता, विकास आघाडीकडे काहीच उरले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील पक्षप्रतोद संजय कोरे, शहाजी पाटील, डॉ. संग्राम पाटील, विश्वास डांगे, अ‍ॅड. चिमण डांगे, आनंदराव मलगुंडे यांच्यासह सौ. मनीषा पाटील, सुनीता सपकाळ या पालिकेच्या कारभारात सक्रिय झाल्या आहेत. त्यांना ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच नगराध्यक्ष निशिकांत पाटील कसे अकार्यक्षम आहेत, हे पटवून देण्यासाठी तत्कालीन पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील पालिकेच्या बाहेर राहून खेळ्या करत आहेत.पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत हजेरी रजिस्टर पळवा-पळवीचे राजकारण तापले आहे. हा फक्त ट्रेलर आहे, यापुढे विकास कामातील टक्क्यावरुन मुख्य सिनेमा जनतेसमोर येणार आहे. (वार्ताहर)