शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोबाईल टॉवरवरून खडाजंगी

By admin | Updated: June 24, 2014 01:20 IST

महापालिका सभा : अधिकाऱ्यांवर कंपन्यांच्या दलालीचा आरोप; फौजदारीचा आदेश

सांगली : विनापरवाना असलेले मोबाईल टॉवर, एकाच टॉवरवर विविध कंपन्यांच्या छत्र्या, त्यावरील घरपट्टीचा घोळ आणि टॉवर सील करण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून होणारी खाबुगिरी यावर महापालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज, सोमवारी महासभेत हल्लाबोल केला. विनापरवाना टॉवरवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. विनापरवाना उभारलेल्या इमारती व त्यावरील टॉवरवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजिज कारचे यांनी दिले. शनिवारी तहकूब झालेली सभा आज घेण्यात आली. विषयपत्रिकेवर मोबाईल टॉवरचा विषय आल्यानंतर सर्वच सदस्य त्यावर तुटून पडले. मोबाईल टॉवरच्या अनेक भानगडींवर सदस्यांनी प्रकाशझोत टाकला. काँग्रेसचे सुरेश आवटी म्हणाले की, तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी मोबाईल टॉवर सील केल्यानंतर लगेचच मोबाईलचे शहरातील नेटवर्क विसकळीत झाल्याचा अनुभव सर्वांनी घेतला होता. सध्याच्या कारवाईत सोळा ते सतरा टॉवर सील करूनही मोबाईलचे नेटवर्क सुरळीत कसे सुरू आहे? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपन्यांशी तडजोड करून सीलचे नाटक केले आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. न्यायालयीन प्रकरणातही जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी वकिलांना माहिती पुरविली नाही. मोबाईल कंपन्यांची बाजू घेणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रात १८३ टॉवर असल्याची माहिती दिली. त्यावरून सदस्य संतप्त झाले. पूर्वी महापालिकेचेच अधिकारी टॉवरची संख्या अडीचशेवर असल्याचे सांगत होते. फेरसर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर ही संख्या घटली कशी, असा सवालही उपस्थित केला. विरोधी नगरसेवक विष्णू माने यांनी, अधिकारी पाकीट घेऊन कंपन्यांशी हातमिळवणी करीत असल्याचा गंभीर आरोप केला. झोपडपट्टीत वीज कनेक्शन घेतानाही महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र लागत असताना, या कंपन्यांना महापालिकेच्या नाहरकतीशिवाय वीज कंपनीने कनेक्शन दिलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, भाजपचे गौतम पवार, अनारकली कुरणे, संगीता खोत, संजय बजाज यांनीही या व्यवहारावर संशय व्यक्त केला. सदस्यांनी हल्लाबोल केल्यानंतर आयुक्त कारचे यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, सध्या दोन कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिकेच्यावतीने योग्य बाजू मांडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल टॉवरबाबत आता शासनाचे परिपत्रक आल्यामुळे कारवाईबाबत अनेक अडचणी आहेत. तरीही परिपत्रक निघण्यापूर्वी ज्या मोबाईल कंपन्यांनी महापालिका क्षेत्रात कोट्यवधीची कमाई विनापरवाना केली आहे, त्यांच्याकडून दंडवसुलीबाबत आम्ही ठाम आहोत. त्याबाबत आम्ही न्यायालयातही सक्षमपणे बाजू मांडणार आहोत. ज्या इमारतींवर टॉवर उभे आहेत, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी यापूर्वीच सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रातील दहा मालमत्ताधारकांनी अद्याप कागदपत्रेच दिली नाहीत. त्यामुळे विनापरवाना इमारतीवरील टॉवरवर कारवाई करण्यात येईल. संबंधितांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)