शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:26 IST

अण्णा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कमालगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मिरज तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी उसनवारीची शक्कल लढविली आहे. शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्राने दाखवून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणुकीपुरता सुरु असलेला हा फसवाफसवीचा प्रकार ग्राह्य धरला जाणार का? हे अर्ज छाननीदिवशी घेतल्या जाणाºया हरकतीवरुन स्पष्ट होणार आहे. ...

अण्णा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कमालगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मिरज तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी उसनवारीची शक्कल लढविली आहे. शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्राने दाखवून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणुकीपुरता सुरु असलेला हा फसवाफसवीचा प्रकार ग्राह्य धरला जाणार का? हे अर्ज छाननीदिवशी घेतल्या जाणाºया हरकतीवरुन स्पष्ट होणार आहे. टॉयलेटच्या अटीने उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आली आहे.तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. सरपंच निवड सदस्यांतून होणार नसल्याने या पदासाठी इच्छुकांची मांदियाळी झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. सरपंच पदासाठी उमेदवारांची संख्या वाढल्यास तितकीच पॅनेलचीही संख्या दिसून येणार आहे. एका-एका गावात तीन ते चार सरपंच पदाचे दावेदार दिसून येत आहेत. अशा चौघांनीही स्वतंत्र पॅनेलचे नियोजन सुरु केले आहे. मात्र त्यांना सदस्य पदासाठी उमेदवार मिळविणे फारच जिकिरीचे झाले आहे. सरपंच पदाच्या मतदानासाठी सदस्य पदाच्या उमेदवाराचीही मदत होणार असल्याने, खर्चासह सर्वच जबाबदारी घेऊन सदस्य पदाचे उमेदवार ओढून-ताणून पॅनेलमध्ये घेतले जात आहेत. त्यांच्यापैकी बºयाच जणांकडे शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदपत्रांच्या सुमारे अठरा अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामधील शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्य पदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवाराकडे शौचालय नाही, अशांनी शेजाºयाकडे असणाºया शौचालयाची उसनवारी करुन निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र तयार करुन, ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजाºयाचे शौचालय वापरत असेल, तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल, तर ते योग्य ठरणार का? हे अर्ज छाननीदिवशी स्पष्ट होणार आहे. शौचालय उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच, तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का घातली गेली आहे? हा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय असावे किंवा शेजाºयाचे करारपत्राने चालेल, याबाबतची भूमिका प्रशासनालाही तातडीने जाहीर करावी लागणार आहे. तरच हा प्रकार थांबणार आहे.करारपत्रावर हरकतीची शक्यता!निवडणूक लढविण्यासाठी शौचालय नसणाºया इच्छुक उमेदवारांचा शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे भासविण्याचा करारपत्राद्वारे प्रयत्न सुरु आहे. अर्ज छाननीदिवशी त्यावर विरोधी गटाकडून हरकत घेतली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हरकत घेतल्यास अधिकाºयांना त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणुकीनंतरही हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.