शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी

By admin | Updated: October 24, 2015 00:25 IST

मोहरमनिमित्त आयोजन : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून देशभर ओळख असलेल्या कडेगाव (जि. सांगली) येथील मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटी शनिवार, दि. २४ रोजी होत आहेत.कडेगावातील मोहरमच्या ताबूत भेटींना १५० वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत प्रथम देशपांडे, पाटील, कळवात व सातभाई असे तीन-चार ताबूत असत. कालांतराने १२ बलुतेदारांनाही या यात्रेमध्ये सामील करून घेण्यात आले. देशपांडे, पाटील, कळवात व सातभाई या मानाच्या व मोठ्या ताबुतांसह बागवान, सुतार, शेटे या सर्व ताबुतांची उंची शंभर ते दीडशे फूट असते. इतर सर्व ताबुतांची उंची त्या मानाने कमी असते.बकरी ईदनंतर ताबुतांच्या बांधणीला सुरुवात होते. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली जाते. ताबुताची बांधणी वैशिष्ट्यपूर्णअसते. आधी कळस मग पाया, या तत्त्वावर ताबुताची बांधणी होते. यामध्ये अष्टकोनी आकाराचे बांबू-कामट्याचे मजले तयार करतात. शुक्रवार पेठ मेल व बुधवार पेठ मेल अशी दोन मेल मंडळे गावात पूर्वीपासून आहेत. या मंडळातील लोक मोहरमच्या ५ तारखेला मशिदीत जाऊन फकीर होतात. दुसऱ्या दिवशी भराचे सोंग असते. दोन्ही मेल मंडळातील लोक सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत गावातून गाणी म्हणत फिरतात. ताबूत उचलण्याचा पहिला मान हिंदूंना आहे. ताबुताचे विसर्जन केले जात नाही. यंदा मोहरमच्या भेटी पाहण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता, जुन्या पोलीस ठाण्यासमोरील मैदान मोकळे करण्यात आले आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे, असे सरपंच राजू जाधव यांनी सांगितले.सकाळी दहापासून दुपारी एकपर्यंत मिरवणुका व नंतर भेटी होणार आहेत. मोहरम भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. दोनशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहरम चौकाकडे जाणारे निमसोड, शिवाजीनगर रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था तहसील कार्यालय तसेच महात्मा गांधी विद्यालय परिसरात करण्यात आली आहे. (वार्ताहर)हजारो भाविक येणारमोहरम यात्रेनिमित्त माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित राहणार आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे मोहरम यात्रेनिमित्त कडेगाव नगरीस भेट देणार आहेत. त्याशिवाय शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविक मोहरम यात्रेनिमित्त कडेगाव येथे येणार आहेत.