शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
3
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
4
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
5
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
6
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
7
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
9
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
10
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
11
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
12
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
13
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
14
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
15
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
16
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
17
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
18
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
19
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
20
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'

शिक्षक बँकेसाठी आज मतदान

By admin | Updated: April 25, 2015 00:12 IST

तयारी पूर्ण : २६ केंद्रांवर नियोजन; बंदोबस्त तैनात

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी शनिवारी मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एकूण २६ मतदान केंद्रांवर ५ हजार ९६७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदानासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शिक्षक बँकेसाठी यंदा चौरंगी लढत आहे. शिक्षक संघातील शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात गट, शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर गट व परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे. आरोप-प्रत्यारोपांनी बँकेच्या निवडणुकीचा रागरंगच बदलला आहे. गेल्या पाच वर्षातील शिक्षक समिती व थोरात गटाच्या कारभारावर शि. द. पाटील यांनी हल्लाबोल केला होता, तर शि. द. पाटील यांच्या काळातील घोटाळे बाहेर काढत समिती व थोरात गटाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या आठ दिवसात उमेदवारांकडून संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यात आला आहे. बँकेच्या कारभारासोबतच वैयक्तिक टीका-टिपणीवर चारही गटांनी भर दिला. त्यामुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी) पाच हजार ९६७ मतदार बँकेच्या २१ जागांसाठी पाच हजार ९६७ मतदार असून शनिवारी २६ केंद्रांवर मतदान होत आहे. सांगली, मिरज, विटा, आटपाडी, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी दोन मतदान केंद्रे आहेत, तर जतमध्ये तीन, संख, आष्टा, भिलवडी, कडेगाव, पलूस येथे एक मतदान केंद्र आहे.