शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कामटेसह सातजणांवर आज आरोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:38 IST

सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सातजणांविरुद्ध सोमवार दि. १० सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सुनावणीची तारीखही ठरविली जाणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगलीत दाखल झाले आहेत.बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे ...

सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह सातजणांविरुद्ध सोमवार दि. १० सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सुनावणीची तारीखही ठरविली जाणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सांगलीत दाखल झाले आहेत.बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज बजरंग कामटे (वय ४०, रा. स्फूर्ती चौक), हवालदार अनिल श्रीधर लाड (५२, रा. यशवंतनगर), नसरुद्दीन बाबालाल मुल्ला (३०), अरुण विजय टोणे (४८, रा. विश्रामबाग, पोलीस वसाहत), पोलीस वाहन चालक राहुल शिवाजी शिंगटे (४१, बालाजीनगर, कुपवाड रस्ता), झिरो पोलीस झाकीर नबीलाल पट्टेवाले (४५, रा. शंभरफुटी रस्ता) व कामटेचा मामेसासरा बाबासाहेब कांबळे (५५, खणभाग, सांगली) या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील कांबळे हा जामिनावर बाहेर आहे, तर अन्य सहा संशयित न्यायालयीन कोठडीत कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबर २०१७ रोजी लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व त्याचा मित्र अमोल भंडारे (दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) यांना ६ नोव्हेंबरला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला होता.हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी अनिकेतचा मृतदेह संशयित पोलीस हवालदार अनिल लाड याच्या मोटारीतून आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेला. मृतदेहासोबत कामटे, लाड, टोणे गेले होते. सोबत अमोल भंडारेलाही नेले होते. तिथे अनिकेतचा मृतदेह जाळला होता. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच राज्यभर खळबळ माजली. सांगली पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. घटनेदिवशी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या ठाणे अंमलदारासह ११ पोलिसांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. ते अजूनही निलंबितच आहेत.राज्य शासनाने या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्त केली होती. अ‍ॅड. निकम या खटल्यात दोन वेळा न्यायालयात हजर झाले आहेत. सोमवारी दि. १० सप्टेंबरला सुनावणी असल्याने अ‍ॅड. निकम रविवारी सांगलीत दाखल झाले. कामटेसह सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करुन सुनावणीची तारीख ठरविली जाणार आहे.हिवरेतील तिहेरी खटल्यास प्रारंभहिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्याचे काम अ‍ॅड. निकम यांच्याकडेच आहे. या खटल्याच्या सुनावणीलाही सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये तीन संशयित आहेत. यापूर्वी निकम यांनी सांगलीतील अमृता देशपांडे, मिरजेतील शाळकरी विद्यार्थी रितेश देवताळे खून-खटल्याचे काम पाहिले होते. या दोन्ही खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.